नवनाथ भिसे
दै. सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले :
माण तालुक्यातील पळशी येथे कुशा चंदर जाधव या कातकरी समाजातील परप्रांतीय कोळसा व्यापाऱ्याचा कुऱ्हाडीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली.
कातकरी समाजातील दोन ते तीन कुटुंब व्यवसायानिमित्त वास्तव्यास होती . त्यांच्यात अंतर्गत वादाचे मारहाणीत रुपांतर होऊन कुशा चंदर जाधव नामक व्यक्तीचा कुराडीने घाव घालून खून करण्यात आला. ही घटना शनिवार दि. २० ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
हल्लेखोर व मयत दोघेही परप्रांतीय असल्याने अद्याप नावे समजू शकले नाहीत. सदर प्रकरणातील आरोपी पळशी येथील खंडोबा माळ परिसरात तब्बल एका तासात म्हसवड पोलिसांनी केला जेरबंद अधिकचा तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे करीत आहेत.
0 Comments