Ticker

6/recent/ticker-posts

वडूजला वृद्ध शेतकर्‍याला फसवून दागिने पळवले

वडूज: आम्ही पोलीस आहोत, असे सांगून गुरसाळेतील शेतकर्‍याची वडूजमध्ये फसवणूक करून 60 हजारांचे दागिने लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विलास नामदेव जाधव (वय 67, रा. गुरसाळे, ता. खटाव) यांनी फिर्याद दिली. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वडूजचा बाजार करून जाधव हे दुचाकीवरून गुरसाळ्याकडे निघाले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अनोळखी इसमाने शिवाजीनगर एसटी स्टॉपजवळ जाधव यांना थांबवले. आम्ही पोलीस आहोत, वडूज शहरामध्ये काही लोकांजवळ गांजा व ट्रक आम्ही पकडला असून त्याअनुषंगाने आम्ही तपासणी करत आहोत. तुमच्याकडील साहित्य रुमालात बांधून गाडीच्या सीटवर ठेवा, असे सांगितले. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने जाधव यांच्याकडील सोन्याचे दागिने, तंबाखूचे पाकीट व चुन्याची डबी असे साहित्य बांधून देत असताना तुमच्या गाडीच्या डिकीत काय आहे, असे म्हणून गुंतवून ठेवत हातचलाखीने जाधव यांचे 60 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तपास हवालदार ओंबासे करत आहेत.

Post a Comment

0 Comments