भेटायला बोलावून खटावात युवकाला मारहाण - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, October 8, 2022

भेटायला बोलावून खटावात युवकाला मारहाण

सत्य सह्याद्री/खटाव
येथील पारायण मंडपासमोर भेटायला बोलावून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी रहिमतपूरच्या दोघांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाब संदीप अशोक काटकर (वय 35, रा. खटाव) यांनी फिर्याद दिली. सागर सुरेश कुंभार (रा. सातारा, सध्या रा. रहिमतपूर) व सोमनाथ भरत भोसले ( मूळ रा. वेळे सध्या रा. रहिमतपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सागर हा इन्फ्रा सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीत खटाव विभागाचा सुपरवायझर असून त्याने संदीपला फोन करून भेटायला बोलावले त्याच्यासोबत कंपनीचा टेक्निशियन सोमनाथ होता. दोघांनी संदीप येताच तुझी मस्ती जिरली का, आता कंपनीने तुला कामावरून कमी केले, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. या भांडणात सोमनाथच्या हातातील टेस्टरचे टोक लागून संदीपच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास हवालदार भोसले करत आहेत. 

शेरे स्टेशन येथून दुचाकी चोरी
कराड: शेरे स्टेशन, ता. कराड हद्दीत राहत्या घरासमोरून 15 हजार रुपये किंमतीची होंडा शाईन दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार विकी भालचंद्र गवळी (वय 31) यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. तपास पोलीस नाईक गडांकुश करत आहेत.

केस काढून घेण्याच्या कारणावरून मारहाण
गोंदवले: कोर्टात सुरु असलेली केस काढून घेण्याच्या कारणावरूम मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी लखन शिवाजी जगदाळे (रा. मोगराळे, ता. माण) याच्याविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत शंकर बापू जगदाळे (वय 74) यांनी फिर्याद दिली. दि. 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास लखन याने तुमच्या केसमुळे मला कोर्टात शिक्षा झाली आहे. तुम्ही वडूज कोर्टात चाललेली केस काढून घेणार आहे की नाही, असे म्हणून दमदाटी, शिवीगाळ करून डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ व डोक्यात जोरात लोखंडी पाईप मारून जखमी केले. तसेच बरकडीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास आर. के. फडतरे करत आहेत.

ट्रकवरून पडून युवकाचा मृत्यू
कराड: ट्रकवरती रस्सी बांधत असताना अचानक रस्सी तुटून खाली पडल्याने डोक्यास मार लागून संदीप आनंदा मगदूम (रा. येरफळे, ता. पाटण) याचा तरुणाचा मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अकस्मात मृत्युची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

ेेशॉक लागून मुलीचा मृत्यू
कोरेगाव: चंचळी, ता. कोरेगाव येथे घराच्या बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची मोटार जोडत असताना शॉक लागून मृणाल संपत काटवटे (वय 15, रा. चंचळी) हिचा मृत्यू झाल्याची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. गणेश पांडुरंग काटवटे (वय 42, रा. चंचळी) यांनी खबर दिली.

बिभवीतून दोन मुली बेपत्ता
मेढा: बिभवी, ता. जावली येथून 19 वर्षीय एक व 18 वर्ष 2 महिने वयाची एक अशा दोन मुली घरातून बेपत्ता झाल्या असून याप्रकरणी पहिल्या मुलीच्या वडिलांनी तर दुसर्‍या मुलीच्या आईने मेढा पोलीस ठाण्यात तक्रार ानोंदवली आहे. दोन्ही घटनांचा तपास सहायक फौजदार सौ. यू. एस. शिंदे करत आहेत.

दुचाकी आडवून मारहाण
मेढा: दुचाकी आडवून मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव किसन रांजणे यांचा भाचा राज आनंद हुमे याच्यासह तिघांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्‍वर शंकर वेंदे (रा. कुसुंबी, ता. जावली, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी दि. 4 रोजी ही घटना घडली असून राज याने गाडी आडवून लाकडी दांडक्याने मारहाण शिवीगाळ केली तसेच त्यानंतर त्याने मामा ज्ञानदेव किसन रांजणे यांना सांगितले त्यानंतर त्याठिकाणी आलेल्या प्रवीण जयवंत शेलार व समीर शेलार (पूर्ण नाव माहित नाही, दोघे रा. आंबेघर, ता. जावली) यांनी मारहाण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

चोपदारवाडीत घरफोडी, 1 लाख 85 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास
मल्हारपेठ: घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून  1 लाख 85 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी मल्हापरेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी मच्छिंद्र रामचंद्र पाटील (वय 62, रा. चोपदारवाडी) यांनी फिर्याद दिली. तपास सहायक पोलीस निरीक्षक यू. एस. भापकर करत आहेत. 

 कारंडवाडीच्या युवकास मारहाण, तिघांवर गुन्हा
सातारा: अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या शुभम सुनील भालेराव (वय 23) याला मारहाण केल्याप्रकरणी येथील तिघांविरोधात गुन्हा मारहाणीसह जातीवाचक शिवीगाळप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या तिघांनी शुभमला पट्ट्याने मारहाण केली असून मराठ्याची पोरगी प्रेम करुन गरोदर ठेवलीस कायू असे म्हणून दमदाटी, शिवीगाळ केली. तसेच काठी व बेल्टच्या सहाय्याने मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावेळी शुभम रहात असलेल्या घराच्या मालकीण यांनी सोडवासोडव केली. अधिक तपास उपअधीक्षक शिंदे करत आहेत.

चाहूर येथे एकास मारहाण
सातारा: विनयभंगाची केस निकाली निघाल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी टोडाराम रामेश्‍वरलाल चौधरी (वय 38) याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीच्या पत्नीने टोडारामच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. ती निकाली निघाल्याने टोडारामने फिर्यादीला शिवीगाळ मारहाण करून त्याच्याकडील अडीच हजार रुपये रोख व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चाहूर, खेड येथे गुरुवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. तपास हवालदार जाधव करत आहेत.

मारहाण प्रकरणी वडोलीच्या तिघांवर गुन्हा
उंब्रज: शेतीला कंपाऊंड करत असताना चिडून जाऊन मारहाण केल्याप्रकरणी वडोली निळेश्‍वर येथील नंदकुमार बजरंग पवार, अजित गोपीनाथ पवार, विजय बजरंग पवार, नितीन विठ्ठल कोळी, बजरंग रामचंद्र पवार यांच्याविरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत निखील सुरज पोळ (वय 24, रा. बनवडी कॉलनी, कराड) यांनी फिर्याद दिली. गुरुवारी 6 रोजी दुपारी शहापूर गावच्या हद्दीत शिवेवरील शेेतात कंपाऊंडचे काम सुरु असताना निखील व त्याचे वडील थांबले असताना संशयितांनी रस्ता का आडवला अशी विचारणा करत सुरजसह अवधुत शंकर डुबल, अरुण किसन डुबल यांना लोखंडी पाईप, कळकाची काठी व दगडाने मारहाण करून जखमी करत शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. याच प्रकरणात यापूर्वी नंदकुमार पवार यांनीही तक्रार दाखल केली होती.

सोमवार पेठेत विवाहितेचा विनयभंग, पतीला मारहाण
सातारा: सोमवार पेठेतील दत्त मंदिरानजीक दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याला आडवून पतीला लाकडी दांडक्याने मारहाण करून विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी चौघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माचीपेठेतील विवाहितेने याबाबत फिर्याद दिली. याप्रकरणी ललित मधुकर देशमाने, अजय हणमंत देशमाने, अभय हणमंत देशमाने (सर्व रा. सोमवार पेठ, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
 पीडित महिला व तिचे पती दुचाकीवरून जात असताना ललित व त्याची पत्नी समोरून आले. त्यांनी दुचाकी आडवून संबंधित महिलेच्या पतीला लाकडी दांडक्याने मारले तसेच महिलेला व तिच्या सासू यांनाही दांडक्याने मारहाण केली. तसेच अजय व अभय यांनी पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली व गाडीचे नुकसान केले तसेच अभय याने विवाहितेचा हात धरून विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हवालदार डमकले तपास करत आहेत.
दरम्यान, याच प्रकरणातील आरोपींच्या घरातील महिलेनेही दिलेल्या तक्रारीवरून आकाश धनंजय साळुंखे (रा. माचीपेठ सातारा) व सौरभ पवार (रा. शाहूनगर) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची महिला घरी चालत जात असताना आकाश एका गाडीवरुन तर सौरभ दुसर्‍या गाडीवरून आला. दोघांनी दुचाकी आडवी मारून वाईट हेतूने हात दाबला तसेच ओढणी हाताने ओढून शिवीगाळ, दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास हवालदार चव्हाण करत आहेत.

विवाहितेचा जाचहाट तिघांविरोधात गुन्हा
सातारा: विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती, नणंदेसह तिच्या नवर्‍याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शुभांगी संतोष माने (वय 32, मूळ रा. देगाव, सध्या रा. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती संतोष भानुदास माने (वय 40, रा. देगाव) नणंद दीपाली उमेश यादव व तिचा पती उमेश यादव (रा. गोडोली) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नोव्हेंबर 2009 पासून तुला जेवण चांगले करता येत नाही, घरातील काम व्यवस्थित करता येत नाही, घर बांधण्यासाठी 50 हजा रुपये आणले नाहीस तर तुला सोडून देईन, दुसरे लग्न करेन व घराचे लॉक तोडून सगळे सामान घेऊन जातो. तू जर तेथे आलीस तुला सुद्धा भोकसून मारतो, असे म्हणून शुभांगीच्या वडिलांना फोन करून तुम्ही जर माझ्या विरोधात तक्रार केली तर तुम्हाला सगळ्यांना बघून घेतो व तुमच्या मुलीला नांदवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच नणंदेने व तिच्या पतीने संतोषला तुझ्या बायकोचे दुसरे लग्न झाले आहे, तिला कशासाठी नांदवतोस असे सांगितल्याने संतोषने वारंवार मारहाण करून शिवीगाळ केली. सर्वांनी मिळून शारीरिक व मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गोंदीत मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा
कराड: गोंदी, ता. कराड येथे युवकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत विक्रम दौलु माळी (वय 30, रा. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली. विक्रम उत्तम मोरे व सावित्री उत्तम मोरे (दोघे रा. गोंदी गावठाण, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी विक्रमच्या बहिणीच्या घरासमोरील मोकळ्या जागेत संशयित हे शिवीगाळ, मारहाण करत असताना तुम्ही बहीण शोभाला मारहाण का करता, असे विचारल्याच्या कारणावरून विक्रम मोरेने दगड कपाळावर मारून जखमी केले. तर सवित्री यांनी शिवीगाळ दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलीस नाईक पाटील करत आहेत.

मोबाईल टॉवरच्या पार्टची चोरी
वाई: वाघजाईवाडी, ता. वाई येथील भिकू सदु वीर यांच्या शेत जमिनीमध्ये असलेल्या जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरचा 40 हजार रुपयांचा महत्त्वाचा पार्ट चोरून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत जिओ मॅनेजर प्रसाद अंकुश कदम (वय29, रा. सिद्धनाथवाडी, वाई) यांनी खबर दिली. तपास हवालदार वरखडे करत आहेत.

सुरुल येथे घरफोडी
पाटण: सुरुल, ता. पाटण येथील घराच्या दरवाजाची कडी, कोयंडा उचकटून 10 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याप्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विक्रम शंकर पवार (वय 29, रा. जुना बसस्टँड पाटण, मूळ रा. सुरुल) यांनी फिर्याद दिली. तपास सहायक फौजदार एस. आर. कोळी करत आहेत.

1 लाख 88 हजार रुपयांसह बॅग लंपास
वाई: जोशीविहीर गावच्या हद्दीत वाई-वाठार रस्त्यावर असलेल्या न्यू कैलास फुड्स अ‍ॅन्ड स्वीट्स मिठाईच्या दुकानात खुर्चीवर ठेवलेली 1 लाख 88 हजार रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार रामदास गुलाबराव धुमाळ (वय 65) यांंनी भुईंज पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एस. मोरे करत आहेत. घटनास्थळी उपअधीक्षक शीतल जानवे-खराडे यांनी भेट दिली. 



No comments:

Post a Comment