सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण:
फलटण शहरात वर्दळीच्या रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे एका ठेकेदाराच्या
चारचाकी गाडीची काच फोडून भरदिवसा चोरट्यांनी तब्बल साडेअकरा लाखांची रोकड
लंपास केल्याने एकच खळबळ उडाली असून शहरात सणासुदीच्या काळात चोरटे पुन्हा
सक्रिय झाल्याने पोलिसांपुढील डोकेदुखी वाढली आहे.
याबाबत माहिती अशी,
धुळदेव, ता. फलटण येथील ठेकेदार प्रवीण गोविंद कोल्हे (वय 32) शुक्रवारी
सकाळी 11 च्या सुमारास होम डेकोर ऑफिस रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे आपली टाटा
कंपनीची हेरिअर ही चारचाकी उभी करून कामानिमित्त गेले होते. 11. 30 ते 11.
40 च्या दरम्यान, ड्रायव्हर सीटच्या पाठीमागील सीटवर तनिष्क ज्वेलर्सच्या
खाकी रंगाच्या पिशवीत ठेवलेले 11 लाख 50 हजार रुपये चोरट्यांनी गाडीच्या
पाठीमागील दरवाजाची काच फोडून लंपास केले.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस
अधिकारी तानाजी बरडे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. सहायक पोलीस
निरीक्षक केनेकर अधिक तपास करत आहेत. शहरात यापूर्वीही चारचाकीची काच फोडून
चोरी झाल्याच्या घटना घडल्या असून पोलीस सर्व बाजुंनी या घटनेचा तपास करत
आहेत. मात्र, भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर चोरी करून चोरट्यांनी पोलिसांना
चांगलेच आव्हान दिले आहे.
Saturday, October 8, 2022
फलटणला चारचाकीची काच फोडून साडेअकरा लाखांवर डल्ला
Subscribe to:
Post Comments (Atom)
फलटण मधे चोरीच्या घटना घडत आहे, काळजी घेणे गरजेचे आहे
ReplyDelete