Ticker

6/recent/ticker-posts

दिगंबर आगवणेसह बारा जणांवर गुन्हा


  सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
 फलटण : दिगंबर रोहिदास आगवणे याच्यासह दहा जणांविरोधात बेकायदेशीर जमीन नावावर केल्याप्रकरणी तसेच 50 लाखांची खंडणी मागितल्याबद्दल फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत नारायण सुभेदार गोळे (वय 46, गोळेगांव पुनर्वसन, लोणंद, ता. खंडाळा) यांनी फिर्याद दिली.
याबाबत माहिती अशी, सन 2014 पासून संशयित दिगंबर आगवणेसह स्नेहल रविंद्र बनसोडे, अविनाश पोपट रिटे (तिघे रा. गिरवी), चंद्रकांत लक्ष्मण रांजणे, दत्तात्रय लक्ष्मण रांजणे, अनुसया उर्फ बाई तुकाराम रांजणे (गोळे), पुष्पा आनंद राजंणे, लिलाबाई लक्ष्मण रांजणे, सोनल आनंद राजणे (रा.जावली) व तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी नारायण गोळे यांच्याकडून खरेदी केलेली जमीन ही तडवळे ता. फलटण येथील तलाठी व मंडलाधिकारी यांना हाताशी धरून बेकायदेशीररित्या स्नेहल बनसोडे व अविनाश रिटे यांच्या नावे करून फसवणूक केली. तसेच आगवणे, बनसोडे  रिटे व तीन अनोळखी इसमांनी नारायण गोळे यांचे अपहरण करून पिस्टल, काठीने मारहाण करून अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन 50 लाख रूपयांची खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुय्यम निबंधक कार्यालय, बाणगंगा नदी व फलटण रेस्टहाऊसवर हे प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Post a Comment

0 Comments