अटकेची चाहूल लागताच महेश जाधव फरारी
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा :
बिदाल येथील अवैध बेसुमार वृक्षतोड केलेल्या घटनेची तक्रार पाटबंधारे विभागाने आज्ञाताविरुद्ध दिली होती मात्र चौकशी केल्यानंतर या सर्व चोरी मागील सूत्रधार दहिवडी येथील राष्ट्रवादीचा नगरसेवक महेश जाधव असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावरती दहिवडी पोलीस ठाणे मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर अटकेची चाहूल लागताच महेश जाधव फरारी झाला.
दहिवडी पोलीस स्टेशन हददीतील शेरेवाडी ता. माण गांवचे हददीतील पिंगळी तलावाअंतर्गत बिदाल फिडर कालव्यावरील जलसंपदा विभागाचे मालकीची लिंब, बाभुळ, करंज व इतर लहान मोठी झाडे ही दिनांक ०२/११/२०२२ रोजी सकाळी ११.०० ते दिनांक २२/११/२०२२ रोजीचे १९-३० वा.चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडुन चोरुन नेहली आहेत तसेच काही झाडे तोडुन नुकसान केले आहे वगैरे मजकुरची गौरव राजेंद्र पाडवी शाखा अधिकारी गोंदवले बु. यांनी दिनांक २३/११/२०२२ रोजी दिलेने दहिवडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला होता .
सदर गुन्हयाचा तपास करीत असताना मिळाले गोपनिय माहीतीचे आधारे सदरची चोरी हि १) अनिल किसन जाधव वय २१ वर्षे रा. शिवाजीनगर दहिवडी २) कृष्णा जालींदर जाधव वय १९ वर्षे ३) गणेश जालींदर जाधव वय २३ वर्षे अ.न. २ व ३ राहणार महीमानगड ता. माण यांनी केली असलेचे समजलेने नमुद इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे केले तपासांत त्यांनी सदरचा गुन्हा महेश पतंगराव जाधव रा. दहिवडी ता.माण जि. सातारा याचे सांगणेवरून केला असलेचे सांगितले. सदर गुन्हयाचेकामी १) अनिल किसन जाधव वय २१ वर्षे रा. शिवाजीनगर दहिवडी २) कृष्णा जालींदर जाधव वय १९ वर्षे ३) गणेश जालींदर जाधव वय २३ वर्षे अ.न. २ व ३ राहणार महीमानगड ता. माण यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी यांचेकडुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या झाडांचे १४७० किलो वजनाचे ओंडके व तुकडे हस्तगत करण्यात आले आहेत सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी व गुन्हयाचा मुख्य सुत्रधार महेश पतंगराव जाधव रा. दहिवडी हा फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री समीर शेख पोलीस अधिक्षक सारे सातारा, मा. श्री बापू बांगर अपर पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. श्री. गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी सो सातारा ग्रामीण कॅम्प कोरेगांव अतिरीक्त कार्यभार दहिवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली अक्षय सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक दहिवडी पोलीस स्टेशन, बी. एस. खांडेकर, एस.एन.केंगले, आर.एस. बनसोडे, पी.टी.इंदलकर, पी.बी. कदम सी.आर.खाडे, बाय.आर. मोरे यांनी केली आहे.
0 Comments