सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
देवापूर: माण तालुक्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या वरकुटे मलवडीत सत्तांतर झाले आहे. अभय सिंह जगताप यांच्या परीवर्तन गटाने सत्ता खेचताना तब्बल 11 जागांपैकी 8 जागा मिळवल्या आहेत. अनिल देसाई , बाळकृष्ण जगताप, जयकुमार गोरे गटाला 3 जागावर समाधान मानावे लागले. अभयसिंह जगताप यांच्या परीवर्तन पॅनल चे सरपंच पदाचे उमेदवार विलास खरात यांचा ८६ मतांनी विजय झाला. या ठिकाणीं ३९११ पैकी ३००७ मतदान झाले. अभय सिंह जगताप गटाच्या विलास खरात यांना १५१७ तर अनिल देसाई , बाळकृष्ण जगताप, जयकुमार गोरे गटाचे आनंद खरात यांना १४३१ मतांवर समाधान मानावे लागले.
वॉर्ड क्र १ मधून रुपाली सोनवणे, आबा चव्हान, सविता जगताप, तर वॉर्ड क्र २ मधून चेतन बनसोडे, सिंधु नरळे, सिकंदर इनामदार,, वॉर्ड क्र ३मधून सागर खरात, आटपाडकर, वॉर्ड क्र ४ मधून आम्रपाली बनसोडे, तेजा जाधव, जालिंदर वाघमोडे विजयी झाले. अभय सिंह जगताप गटाचे आबा चव्हान व प्रतिस्पर्धी गटाचे खंडेराव चव्हान यांना सम समान मते मिळाली. या मध्ये ईश्वर चिठ्ठीवर जगताप गटाचे आबा चव्हान यांना विजयी घोषित करण्यात आले.
वरकुटे मलवडी तील ग्राम पंचायत निवडणुकीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. या ठिकाणीं मतदारांनी मतदानासाठी उत्स्फूर्त पणे प्रतिसाद दिला होता. श्वास रोखून धरायला लागलेल्या याच निवडणूकीत सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, मा. सरपंच बाळकृष्णभाऊ जगताप व आ. गोरे गट यांनी नवख्या अभयसिंह विरोधात रण संग्राम उभा केला होता. माञ अटी तटीच्या लढतीत अभय सिंह जगताप यांच्या परिवर्तन पॅनल ने बाजी मारली.
विरोधकांचे मोठे आव्हान स्वीकारून अभय सिंह यांनी जंग जंग पछाडून ग्रामीण विकासाचा अध्याय पटवून दिला. त्याला मतदारांनीही साथ दिली. आणि अखेर वरकुटे मलवडीत परिवर्तन घडले. निवडणुक जस जशी जवळ आली तस तशी अवघड वाटणारी हिच निवडणुक परिवर्तन पॅनल कडे झुकू लागली. विरोधकांनी ही डाव प्रतिडाव टाकत नवख्या अभय सिंह च्या परिवर्तन पॅनल ला नामोहरम करण्याचा डाव टाकला. मागील दोन दिवसात पाठिंब्याचे व्हिडिओ ही समाज माध्यमात व्हायरल करण्यात आले. माञ वरकुट ची जनता परिवर्तन पॅनल च्या पाठीशी ठाम राहिली.
शह काटशहला न जुमानता अखेर मतदार राजाने परिवर्तन पॅनल ला झुकते माप देउन तालुक्यांतील मोठया ग्राम पंचायत पैकी एक असलेल्या वर कुटे मल वडी ग्राम पंचायत मध्ये परिवर्तन घडवले. विजयाचा गुलाल आमचाच हा दृष्टिकोन ठेवून अभय सिंह जगताप यांनी मतदार कार्यकर्त्यांना संयमाचा दिलेला सल्ला अखेर परिवर्तन पॅनल ला विजयापर्यंत घेऊन गेला. दहिवडी तून विजयाचा गुलाल उधळत नाथ नगरी म्हसवड ते वरकुटे मलवडी अशी मिरवणूक अनेकांचे लक्ष वेधून घेत होती.
या विजयात परिवर्तन पॅनल च्या जेष्टांसहित युवक कार्यकर्त्यांच्या मोठया फळीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही निवडणुक मूलभूत पायाभूत विकासावर प्रचंड गाजली.straight politics - no matter वर चाललेल्या या निवडणुकीने माञ कुकुडवाड जिल्हा परिषद गटाचे वातावरण माञ ढवळून निघाल्याच्या भावना उमटत आहेत. आजचा ऐतिहासीक विजय हा स्व. खाशेबापू जगताप व स्व. पिंटू दादा जगताप व नागरिकांच्या मेहनतीला अर्पण करत असल्याच्या भावना पदाधिकारी यांनी व्यक्त केल्या. एकूणच कुकुड गटात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँगेस चे सर चिटणीस अभय सिंह जगताप यांचे तगडे आव्हान असणार आहे.
0 Comments