नवनाथ भिसे
सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
गोंदवले :आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी काम बंद आंदोलन करून प्रशासकीय कार्यालयावर मोर्चे काढले.
गेल्या कित्येक वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार गगनाला भिडण्यासारखे झाले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी कर्मचारी सुखी आणि समृद्ध झाला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचा आलिशान बंगला,आलिशान कार देखील आहे. कर्मचारी सरकारी जरी असला तरी भरमसाठ पगारामुळे मुले खाजगी इंग्लिश मीडियमला शिकतात. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरामध्ये सर्वात जास्त ह्या प्लॉटिंग जमिनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या असलेले दिसून येते. सरकारी कर्मचारी हा लग्न करताना बायको देखील सरकारी पगाराचीच बघतो. त्यामुळे देखील डबल पगारी असणारे कुटुंब जास्त पाहायला मिळतात. महिन्याकाठी लाख रुपये घरात येत असताना देखील काम बंद ठेवून पेन्शन साठी एल्गार कशासाठी. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकाही सरकारी कर्मचाऱ्यांने पगार कमी असल्याचे कारणाने आत्महत्या केली असल्याचे दिसून आले नाही.
मात्र महाराष्ट्रात वर्षाला कितीतरी शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करत आहेत. खते बी बियाणे महागली मात्र शेतमालाचे दर वाढले नाहीत. पिढ्यान पिढ्या शेतकऱ्याच्या सातबारावर बोजा चढलेला आहे. पोटाची खळगी भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षण घेताना सुद्धा काटकसर करावी लागते. वाढत्या महागाईच्या काळात शेतकऱ्याला महिन्याकाठी दहा हजार रुपये कमवताना देखील रखरखत्या उन्हामध्ये कष्टाचा घाम गाळावा लागतो. तरी देखील दहा हजार रुपये मिळतील का नाही याची गॅरंटी नसते. मात्र सरकारने नेहमीच निराश केलेला शेतकऱ्याने कधीही काम बंद ठेवून आंदोलन केले नाही. कधीच शेती पिकवणे बंद केले नाही. या या शेतकऱ्यांना कोणतेही वेतन नाही कोणतीही पेन्शन नाही. टेन्शन मात्र कायम त्यांच्या नशिबीच राहिले.
50 हजार रुपयांच्या पुढे पगार असताना पेन्शनची गरज पडतेच कशाला. चांगले जीवन जगायला दहा हजार रुपये देखील पुरेसे होतात हे येथील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. अशी चर्चा जनतेतून होत आहे..
50 हजार पगार आणि बायको नोकरीला असेल तर घरामध्ये लाख रुपये येतात तरी देखील आज रखरखत्या उन्हामध्ये पेन्शन मिळावे म्हणून काम बंद आंदोलन करून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र ऊन,वारे पाऊस थंडीचा विचार न करणारा आमचा शेतकरी वेतन द्या,पेन्शन द्या म्हणून कधीही रडला नाही..
समीर जाधव
शेतकरी, दहिवडी
0 Comments