Hot Posts

6/recent/ticker-posts

महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्याकडे लक्ष द्यावे-सौ.तेजल कोठारी

औंध .ता.खटाव या ठिकाणी वुई मी फाउंडेशनच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त औंध येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. यादिनानिम्मित सौ.तेजल कोठारी यांचे महिला आरोग्य आहार व व्यायाम याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.महिलांचे आरोग्य व आहार या विषयावर त्यांनी उत्कृष्ट प्रबोधन केले व योगा, प्राणायाम, आहार, बदलती जीवनशैली यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सावंत मॅडम होत्या. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तेज योग स्टुडिओच्या संचालिका सौ. तेजल कोठारी व वुई मी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रशांत शेडगे सर उपस्थित होते .

महिला दिनाचे औचित्य साधून विविध विद्यार्थिनी राणी लक्ष्मीबाई, सिंधुताई सपकाळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ.आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर एकांकिका स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी शिवानी कदम, द्वितीय क्रमांक कुमारी पूजा पवार, तृतीय क्रमांक प्राजक्ता पवार व श्रद्धा घाडगे उत्तेजनार्थ मिळविले . एकांकिका स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ.श्री शैल्य कोरे, प्रा. डॉ.सुखदेव भोसले व प्रा. डॉ. हनुमंत पोळ यांनी काम पाहिले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. साहेबराव अन्नापुरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. शहनाज मोमीन यांनी करून दिली. कार्यक्रमाचे आभार प्रा. श्रीमती संगीता बर्गे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments