Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामसेवक संतोष माळवेला निलंबित करा, पिंपरी ग्रामस्थांची मागणी


गटविकास अधिकारी यांना निवेदन देताना पिंपरी गावचे ग्रामपंचायत सदस्य व नागरिक
 ( छायाचित्र: नवनाथ भिसे )
सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
गोंदवले :कर्तव्यामध्ये कसूर करून मनमानी कारभार करत ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये कोणालाही विश्वासात न घेता राजकीय हेतू ठेवून आर्थिक अपहाराच्या उद्देश ठेवून कामकाज केल्याप्रकरणी पिंपरी तालुका माण येथील  
 ग्रामसेवक संतोष कुमार माळवे याची चौकशी करून नोकरीतून निलंबित करावे अशी मागणी पिंपरी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.
     पिंपरी गावच्या सरपंच सौ. कोमल शिरीष राजगे यांनी ग्रामपंचायत मीटिंगमध्ये सांगितले होते की,मी माझ्या सरपंच पदाचा राजीनामा स्वखुशीने देत आहे.तरी तसा ठराव मंजूर झाला असताना. सरपंच सौ कोमल राजगे यांनी पुन्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले आहे की,मी राजकीय दबावापोटी राजीनामा द्यायचे ठरविले होते.परंतु मला आता राजीनामा द्यायचा नाही.असे अपील जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.आणि ग्रामसेवक संतोषकुमार माळवे यांनी ग्रामपंचायत मीटिंगचा ठराव बदलून स्वतःच मनमानी कारभार करत कोणाच्यातरी राजकीय दबावापोटी दुसरा ठराव तयार केला की,सरपंच सौ. कोमल शिरीष राजगे यांनी राजकीय दबावातून राजीनामा दिल्याचे ग्रामपंचायत मीटिंगमध्ये सांगितले होते. मात्र पिंपरी ग्रामपंचायत सदस्याचे म्हणणे आहे की,असा ठराव झालेला नाही. ग्रामसेवकाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व कोणाच्यातरी राजकीय दबावातून हा ठराव तयार केला आहे.
       तसेच ग्रामसेवक माळवे हे कोणाची तरी राजकीय सुपारी घेऊन काम करत असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य दादा महादेव राजगे हे मिटींगला वेळेवर उपस्थित असून देखील त्यांना मनमानी पद्धतीने त्यांना तुम्ही मिटींगला उशिरा आला असे सांगत त्यांना ठरावावरती सह्या करू दिल्या नाहीत.
     तसेच ग्रामपंचायत विकास कामांमध्ये कोणालाही विश्वासात न घेता गावामध्ये एकमेकांमध्ये भांडण लावून स्वतःचा आर्थिक फायदा साधण्यासाठी अशा गोष्टी करत आहेत. असा पिंपरी ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे अशा ग्रामसेवकाची विभागीय चौकशी करून निलंबन करावे अशी मागणी पिंपरीच्या ५ ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments