सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मेढा: जावळीची राजधानी मेढा येथे सोमवारी पुन्हा ऐकायला मिळणार एक मराठा लाख मराठा ची डरकाळी . मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सध्या मनोज जरांगे पाटिल यांच्या आमरण उपोषणाच्या नवीन भूमिके नंतर महाराष्ट्रभर विविध पडसाद व पाठिंबा पहावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी या मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी, समर्थनात साखळी उपोषण, आमरण उपोषण, रास्ता रोको, मोटरसायकल रॅली त्याचबरोबर विविध शासन स्तरावर निवेदन देणे सुरू आहे.
जावळी तालुक्यात आजवर मराठा आरक्षणासाठी झालेल्या सर्वच उपक्रमात जावळीतील सर्व मराठा बांधवांनी अतिशय मोलाचे योगदान दिलेले आहे. सद्या मराठा आरक्षण साठी सर्वसामान्य कुटुंबातील जरांगे पाटलांना पुन्हा एकदा जावळीतून बळ देण्यासाठी सोमवारी मोटर सायकल रॅलीचे आयोजन केले आहे जेणेकरून आरक्षणाचा हा लढा पूर्णपणे यशस्वी होईल म्हणून मराठा समन्वयक व तालुक्यातील विविध लोकांच्या चर्चेनुसार सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ठीक ११-०० वाजता भैरवनाथ मंदिर मेढा आवारामध्ये सर्व मराठा बांधवांनी एकत्र यायचं आहे . सदर ठिकाणी प्रथम मीटिंग होईल त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल. मिटींग मध्ये ठरलेल्या बाबींचे प्रशासनाला निवेदन देण्यासाठी मोटरसायकल रॅली चे आयोजन करणेत आलेची माहीती सकल मराठा समाज जावली चे वतीने देणेत आली आहे .
मराठा आरक्षण मिळवणे साठी जरांगे पाटलांना पुन्हा एकदा जावळीतून बळ देण्यासाठी ,सोमवारी मिटींग साठी व रॅलीमध्ये सर्व युवक, महिला माता-भगिनी , सर्वच मराठा बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन जावळीच्या सकल मराठा समाजाने केले आहे
0 Comments