अनिल देसाई यांचे बारामतीत शक्ती प्रदर्शन, विजयाची तुतारी वाजवून दाखवणार - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, September 11, 2024

अनिल देसाई यांचे बारामतीत शक्ती प्रदर्शन, विजयाची तुतारी वाजवून दाखवणार

बारामती 
संधीचं सोनं करणार आणि माण खटावमध्ये  विजयाची तुतारी वाजवून दाखविणार असा विश्वास माण खटाचे युवा नेते अनिल देसाई यांनी गुरुवारी बुधवारी व्यक्त केला
 बारामती मधील गोविंदबाग येथे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष मा.श्री. शरद पवार साहेब यांची भेट घेऊन माण खटाव विधानसभा मतदार संघातून देसाई यांनी उमेदवारीची मागणी केली. साहेबांच्या राष्ट्रवादीच्या परिवर्तनवादी विचारधारेचा वसा आणि साहेबांचा आशीर्वाद असला तर माण खटाव तालुक्यात विजयाची तुतारी निनादेल असा विश्वास दिला. मला संधी मिळाली तर मी माण खटाव राष्ट्रवादीमय करून दाखविणार हा निर्धार आहे. यावेळी समवेत खटाव आणि माण तालुक्यातील देसाई यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment