रहिमतपूर येथील ती घटना ‘अफवाच’ - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, September 8, 2024

रहिमतपूर येथील ती घटना ‘अफवाच’

सत्य सह्याद्री/रहिमतपूर
रहिमतपूर परिसरातील एका शिक्षकाच्या आणि विद्यार्थिनीच्या अनैतिक संबंधाबाबत सुरु असलेली चर्चा ही अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रहिमतपुरात चर्चा एका काळ्या घटनेची या मथळ्याखाली दि. 3 सप्टेंबरच्या अंकात वृत्त प्रसिद्ध झाले होते. यामध्ये शहर परिसरात सुरु असलेली चर्चा खरी की खोटी याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. देशातील, राज्यातील अनेक घटनांच्या पार्श्‍वभूमीवर यातील गांभीर्य लक्षात घेऊन सत्य सह्याद्री प्रतिनिधीने अधिक माहिती घेतली असता या केवळ चर्चाच असून अशा कोणत्याही प्रकाराबाबत कोणतीही फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झालेली नसल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे सदरची घटना केवळ अफवाच असल्याचे तुर्तास स्पष्ट झाले आहे. या चर्चांमुळे शहराचीही विनाकारण बदनामी झाली तसेच काही काळ यंत्रणेवरील ताण देखील वाढला होता.

No comments:

Post a Comment