भीषण अपघातात युवकाचा मृत्यू - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, September 6, 2024

भीषण अपघातात युवकाचा मृत्यू

सातारा: ग्वाल्हेर-बंगळुरु आशियायी महामार्गावर ट्रक आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात होऊन झालेल्या अपघातात रुग्णवाहिकेचे चालक संतोष पवार (वय 35, रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीला वाचवण्याच्या नादात रुग्णवाहिका कंटेनरवर पाठीमागून आदळून हा अपघात घडला.  
संतोष पवार हे येथील श्‍वास हॉस्पिटल येथे चार वर्षांपासून रुग्णवाहिका चालक होते. ते गुुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास रुग्ण घेऊन पुणे येथे गेले होते. तेथून परतत असताना रायगाव फाटा येथील तेजस डेअरीसमोर त्यांची रुग्णवाहिका आली असताना समोरील दुचाकीला वाचवण्याच्या नादात वाहन समोरील कंटेनवर आदळले. या अपघातात रुग्णवाहिकेचा  चक्काचूर झाला यात संतोष पवार हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने श्‍वास रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने उपचार सुरु असताना पहाटे साडेचारच्या सुमारास संतोष यांचे निधन झाले.
त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. संतोष पवार हे सातार्‍यातील राजधानी अ‍ॅम्ब्युलन्स चालक-मालक संघटनेचे कार्याध्यक्ष तसेच शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे सदस्य होते. त्यामुळे ते सातारा शहर परिसरासह तालुक्यात सुपरिचित होते. त्यांच्या अपघाताचे वृत्त समजताच त्यांच्या मित्र परिवाराने तसेच नातेवाईकांनी रुणालयाकडेे धाव घेतली.
 त्यांच्या मृतदेहावर क्षेत्रमाहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या अंत्ययात्रेत रुग्णवाहिका चालक तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील हजारो मान्यवर उपस्थित होते. त्यांनी पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. अपघाताची खबर शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली.

No comments:

Post a Comment