म्हसवड ता.माण येथे अप्पर तहसील कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी बोलताना आ.जयकुमार गोरे .
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले: माझ्या अंतिम टप्प्यात आलेल्या दुष्काळमुक्तीच्या लढाईत आणि गावोगावच्या विकासकामांमध्ये खोडा घालणाऱ्या कवसकुलीच्या बिया बारामतीतच नव्हे तर माण - खटावमध्येही आहेत. म्हसवड शहराला आदर्श शहर बनवण्यासाठी सर्वांगीण विकास साधत आपण सर्वतोपरि प्रयत्न करत असतानाही अडथळे येत आहेत.म्हसवडसह परिसरातील 47 गावातील नागरीकांचा वेळ व पैसा वाचवत त्यांना ग्रामीण भागातून शासकीय कामांसाठी दहिवडीला जावे लागू नये, यासाठी म्हसवड येथे अप्पर तहसिल कार्यालय आणण्यासाठी आपण अथक प्रयत्न केले होते.त्या प्रयत्नांना यश आले आहे.या कार्यालयामुळे नागरीकांची सोय झाली असून शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यास याची मदत होणार असल्याचे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
म्हसवड येथे अप्पर तहसील कार्यालयाचा उद्घाटन समारंभ तसेच शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सोनिया गोरे, डॉ.दिलीपराव येळगावकर,अर्जुन काळे,अरुण गोरे,डॉ.संदीप पोळ ,दादासाहेब काळे,अतुलदादा जाधव,शिवाजीराव शिंदे,विलासराव देशमुख, प्रांत उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर,मुख्याधिकारी सचिन माने,हरिभाऊ जगदाळे,सोमनाथ भोसले,किसन सस्ते,गणेश सत्रे, आप्पासाहेब पुकळे,विशाल बागल,सिद्धार्थ गुंडगे, नितीनभाई दोशी,विजय धट,डॉ.मासाळ, सुनील पोरे, गुलाब कट्टे, विष्णुपंत कट्टे, आजी-माजी नगराध्यक्ष सर्व नगरसेवक ,माण तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी,पदाधिकारी, कार्यकर्ते,नागरीक उपस्थित होते.
आ.जयकुमार गोरे म्हणाले,प्रत्येक समाजाला न्याय देण्याची आपण कायम भूमिका घेतली आहे. त्यामुळे सर्व समाजाच्या विविध विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही.अहिल्यादेवी स्मारक,महात्मा फुले परिसर सुशोभीकरण,बौद्ध समाजासाठी भव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन,मातंग समाज सभागृह ग्रंथालय, अण्णा भाऊ साठे पुतळा व समाज मंदिर ,नाभिक समाज सभागृह ,नागोबा मंदिर सभागृह , माळी समाज सभागृह अशी अनेक विकासकामे आपण साकारत आहोत. खाणीत २४ कोटींचे सुंदर असे सभागृह बांधणार आहे.त्या स्मारकापुढे भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणार आहे.बगीचा दुरुस्ती साठी अडिच कोटींचा निधी मिळाला आहे. तहसील कार्यालय सुरु झाले आता रजिस्टर कार्यालय लवकर करणार आहे.तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी एमआयडिसी होणार आहे.चार महिन्यांनंतर २४ तास पाणी शहरवासीयांना मिळणार आहे. म्हसवड साठी ९० कोटी तर वडूजसाठी ५० कोटींची भुयारी गटार योजना फक्त ७२ तासांत मंजूर करुन आणली आहे.म्हसवड करांनी कायम साथ देत प्रेम दिले आहे. नाथनगरीचे प्रचंड उपकार आहेत.त्यामुळे विविध विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या प्रेमातून उतराई होत आहे.
यावेळी शिवाजीराव शिंदे,अर्जुन काळे आदींनी मनोगते व्यक्त केली.
चौकट -
भाजपमध्ये इनकमिंग जोरात
.....
म्हसवड येथील कार्यक्रमादरम्यान गोंदवले बुद्रुक सरपंच जयप्रकाश कट्टे,वाघमोडेवाडीचे माजी सरपंच सयाजी वाघमोडे यांनी कार्यकर्त्यांसह आ.जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये
पक्ष प्रवेश केला. परवा विखळे येथेही निमसोडचे सरपंच आणि अनेक सहकाऱ्यांनी आ. गोरे गटात प्रवेश केला.
No comments:
Post a Comment