योगेश्वरानंद
गिरी महाराज यांना श्री श्री. १००८ महामंडलेश्वर पदवी बहाल करताना देशातील
अनेक महान संत. जगतगुरु व महा मंडलेश्वर इत्यादी.
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले : महाराष्ट्रातील अनेक महान संत, महंत, महामंडलेश्वर, जगतगुरू
यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या पट्टा अभिषेक सोहळ्यामध्ये
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एस्ट्रोलॉजिस्ट योगेश्वरनंद गिरी महाराज यांची
श्री श्री. १००८ महामंडलेश्वर पदी नियुक्ती करण्यात आली.प्रयागराज
स्थित अल्लापुर मधील तिलकनगर येथे पट्टाअभिषेक सोहळा संपन्न झाला असून
श्री.पंचदशनाम श्रीसंत गुरूदत्त अखाड्याचे संस्थापक गुरु श्री.श्री.१००८
आदित्य आनंद गोल्डनगिरी महाराज , अखाडा संरक्षक श्री.श्री.१००८ चैतन्यगिरी
महाराज,अखाडा सचिव श्री.श्री.१००८ कृष्णानंद महाराज,अखाडा महामंत्री
वीरेंद्र आनंदगिरी महाराज आणि अर्धनारीश्वर समाज अध्यक्षा श्री.श्री.१००८
सोनियानंद गिरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील प्रमुख पदी योगेश्वरानंद
गिरी महाराज यांना श्री.श्री.१००८ महंडलेश्वर ही पदवी बहाल करण्यात आली. श्री.पंचदशनाम
श्रीसंत गुरूदत्त अखाड्याचे प्रमुख उद्देश सनातन धर्माचा प्रचार आणि
प्रसार करणे , गोरक्षा आणि धर्मरक्षा मजबूतीवरती लक्ष केंद्रीत करणे आहे. अखाडा पट्टाअभिषेक पार पडल्या नंतर अनेक संत ,महंत,महामंडलेश्वर ,जगदगुरु,व पीठाधीश्वर यांना धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जिम्मेदारी सोपवण्यात आली..
.
No comments:
Post a Comment