मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर २०२४, शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, कार्तिक शुक्ल चतुर्थी,
विनायक चतुर्थी ( अंगारक योग ), चंद्र -
वृश्चिक राशीत सकाळी ९ वा. ४५ मि. पर्यंत नंतर धनु राशीत, नक्षत्र -
ज्येष्ठा स. ९ वा. ४५ मि. पर्यंत नंतर मूळ, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ४२ मि.
, सुर्यास्त- सायं. १८ वा. ०२ मि.
नमस्कार
आज चंद्र वृश्चिक राशीत स. ९ व. ४५ मि. पर्यंत रहात असून नंतर तो धनु
राशीत रहाणार आहे. आजचा दिवस भद्रा वर्ज्य दिवस आहे. आजचा दिवस सर्व
राशींना संमिश्र स्वरुपाचा जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष
: गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता दुपारनंतर संपणार आहे. कामाचा ताण कमी
होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर पूर्ण होतील. उत्साही रहाल. प्रवास सुखकर
होतील. दुपारनंतर उत्साह व उमेद वाढेल.
वृषभ
: प्रवासात काळजी घ्यावी लागणार आहे. दुपारनंतर मनोबल कमी राहील.
हितशत्रूवर मात करु शकणार आहात. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची कामे आज नकोत.
मिथुन
: दुपारनंतर कामाचा ताण कमी होईल. प्रवास सुखकर होतील. आनंदी व आशावादी
रहाणार आहात. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. उत्साही रहाल. दुपारनंतर
मानसिक अस्वस्थता कमी होईल.
कर्क
: काहींचा वेळ व पैसा अनावश्यक कामात खर्च होणार आहे. कामाचे नियोजन
चुकणार आहे. दैनंदिन कामे मनोबलपूर्वक पूर्ण करावीत. प्रवासात काळजी
घ्यावी. वाहने चालविताना विशेष दक्षता घ्यावी.
सिंह
: बौद्धिक कामगिरी उत्तम होईल. कामे यशस्वी होणार आहेत. दुपारनंतर आनंदी
रहाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील. आर्थिक नियोजन योग्य ठरेल. दुपारनंतर
काहींना अचानक धनलाभ संभवतो.
कन्या
: मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी रहाणार आहात. मनोबल उत्तम
राहील. प्रवास सुखकर होतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होणार
आहेत.
तुला : जिद्दीने
कार्यरत राहणार आहात. तुमच्यामध्ये असणारी चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम
राहील. प्रवास सुखकर होतील. एखादी नवी सुसंधी लाभेल. मानसिक प्रसन्नता
लाभणार आहे.
वृश्चिक :
आर्थिक कामास अनुकूलता प्राप्त होईल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ
संभवतात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आनंदी व आशावादी रहाल. कौटुंबिक
स्वास्थ्य लाभणार आहे.
धनु
: गेले दोन दिवस रखडलेल्या कामात आज सुयश लाभेल. दुपारनंतर मानसिक
उद्विग्नता संपेल. कामाचा ताण कमी होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. आरोग्य
उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल.
मकर
: दुपारनंतर दैनंदिन कामात काही अनपेक्षित अडचणी जाणवतील. मानसिक त्रास
होईल. एखादा मनस्ताप संभवतो. वाहने सावकाश चालवावीत. हितशत्रूवर मात कराल.
दुपारनंतर काही अनपेक्षित खर्च संभवतात.
कुंभ
: आनंदी रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर प्रियजन भेटतील. प्रवास
सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. सन्ततिसौख्य लाभेल. मानसिक
प्रसन्नता लाभणार आहे.
मीन
: दुपारनंतर विशेष आनंदी रहाल. व्यवसायातील आर्थिक कमाई उत्तम राहील.
मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहेत.
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
आज
मंगळवार, आज दुपारी ३ ते ४.३० यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास,
प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य
करावीत.
जन्मपत्रिकेवरुन
वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क
९८२२३०३०५४ गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४
No comments:
Post a Comment