सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: सातारा जिल्हा प्रशासाने केलेली जनजागृती आणि मोठ्या प्रमाणातील चुरस यामुळे गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा सातारा जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढला आहे. यंदा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील 26 लाख 42 हजार 794 पैकी 19 लाख 1 हजार 590 अर्थात 71 .95 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आयोगाने रात्री उशिरा झालेल्या मतदानाची संपूर्ण आकडेवारी जाहीर केली.
हाती आलेल्या आकडेवारीनुसार फलटण राखीव मतदारसंघात 71.06 टक्के मतदान झाले. 73.07 टक्के परुष तर 68.99 टक्के महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण 3 लाख 39 हजार 662 पैकी 1 लाख 26 हजार 364 पुरुष व 1 लाख 15 हजार 4 महिलांनी मतदानेकेले.
वाई मतदारसंघात 3 लाख 47 हजार 90 पैकी 1 लाख 21 हजार 266 पुरुष व 1 लाख13 हजार 272 पुरुष व अन्य 8 अशा 2 लाख 34 हजार 544 जणांनी मतदानेकेले. या मतदारसंघात 67.57 टक्के मतदान झाले.
कोरेगाव-खटाव मतदारसंघात यंदा सर्वाधिक मतदान झाले. 3 लाख 21 हजार 122 मतदारांमधील 1 लाख 28 हजार 642 पुरुष व 1 लाख 20 हजार 668 महिलांनी मतदान केले. यंदा कोरेगावची टक्केवारी 77.64 टक्के आहे.
माण मतदारसंघात 3 लाख 60 हजार 662 पैकी 1 लाख 33 हजार 994 पुरुष व 1 लाख 25 हजार 605 व अन्य 4 मतदारांनी मतदान केले. येथे 71. 98 टक्के मतदान झाले.
कराड उत्तर मतदारसंघात 3 लाख 6 हजार 20न पैकी 1 लाख 18 हजार 455 पुरुष व 1 लाख 10 हजार 372 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघाची टक्केवारी 74.73 इतकी आहे.
कराड दक्षिण मतदार संघात 76.32 टक्के मतदान झाले. 3 लाख 15 हजार 420 पैकी 1 लाख 23 हजार 896 पुरुष व 1 लाख 16 हजार 835 महिलांनी मतदान केले.
पाटण मतदारसंघात 3 लाख 9 हजार 963 मतदारांपैकी 1 लाख 18 हजार 544 पुरुष तर 1 लाख 10 हजार 938 महिलांनी मतदान केले. टक्केवारी 74.04 टक्के आहे.
जिल्ह्यात सर्वात कमी 63.53 टक्के मतदान सातारा मतदारसंघात झाले. येथे 3 लाख 42 हजार 672 पैकी 1 लाख 11 हजार 120 पुरुष व 1 लाख 6 हजार 567 महिलांनी मतदान केले.
Thursday, November 21, 2024
Home
Unlabelled
सातारा जिल्ह्यात 71. 95 टक्के मतदान
सातारा जिल्ह्यात 71. 95 टक्के मतदान
About सत्य सह्याद्री
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment