मराठानगरला जोतिर्लिंग यात्रेस आजपासून प्रारंभ - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, November 14, 2024

मराठानगरला जोतिर्लिंग यात्रेस आजपासून प्रारंभ

मायणी : दि .१३ प्रतिनिधी तानाजी चव्हाण
सालाबाद प्रमाणे मौजे मराठानगर,ता.खटाव येथील ग्रामदैवत श्री.जोतिर्लिंग देवाची भव्य यात्रा गुरुवार दि.१४ नोहेंबर २०२४ रोजी ते सोमवार दि.१८ नोहेंबर २०२४ अखेर विविध धार्मिक,सांस्कृतिक,व सामाजिक उपक्रमशिल कार्यक्रमांद्वारे होणार आहे.                      
यात्रेनिमित्त गुरुवार दि.१४ नोहेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते१२ महिलांसाठी हळदी - कुंकू कार्यक्रम तसेच दुपारी ३ ते ५ श्री.सत्य नारायण महापूजा,रात्री ९ वाजता श्री. भैरवनाथ नाट्यरूपी भारूडी भजन येलमरवाडी यांचा भारूडी भजनाचा कार्यक्रम होणार आहे.                 

शुक्रवार दि.१५ रोजी दुपारी २ ते ५ गजी नृत्याचा कार्यक्रम जयभवानी गजी मंडळ चितळी व कानकात्रे गजीमंडळ यांचा गजांचा कार्यक्रम होणार आहे.सायंकाळी ७ ते ९ (छबीना) फटाक्यांच्या आतषबाजीत जोतिर्लिंग देवाची पालखीतून भव्य मिरवणूक निघणार आहे. रात्री ९ वाजवा किशोर कुमार कोल्हापूर यांचा बहारदार ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम, शनिवार दिनांक १६ रोजी सकाळी ९ ते १ साधू आत्मा कासेगांवकर यांचा लोकनाट्य तमाशा,दुपारी १ ते ५ वाजता यात्रेचा मुख्य रथोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे.ढोल ताशांच्या गजरात जोतिर्लिंग देवाची रथातून संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक निघणार आहे.तर रात्री ९ वाजता 'बारा गावच्या बारा अप्सरा' पुणे यांचा लावण्यांचा बहारदार मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे, रविवार दिनांक १७ रोजी सकाळी १० ते ३ कमल अनिता कराडकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे .             
तरी या सर्व कार्यक्रमांचा परिसरातील ग्रामस्थ व सर्व भाविक-भक्तांनी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा.असे आवाहन यात्रा कमेटी,समस्त ग्रामस्थ मंडळ मराठानगर यांचे वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment