दहिवडी पोलिसांचा जिल्ह्यात डंका अधीक्षकांच्या हस्ते तीन पुरस्काराने सन्मानित. - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, November 13, 2024

दहिवडी पोलिसांचा जिल्ह्यात डंका अधीक्षकांच्या हस्ते तीन पुरस्काराने सन्मानित.

IMG-20241113-WA0473
   
सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 
गोंदवले :
दहिवडी पोलीस स्टेशनच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल  पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व टीमला विविध पुरस्कार व रोख रक्कम बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
माहे ऑक्टोबर या महिन्यात महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तसेच CCTNS मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या हस्ते बेस्ट पोलीस स्टेशन इन महिला पथदर्शी प्रकल्प आणि बेस्ट पोलीस स्टेशन इन CCTNS असे दोन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
 तसेच दहिवडी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील आरोपीतास अवघ्या दोन तासात पकडून त्याच्याकडून चोरून नेलेला १२ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक केल्याबद्दल देखील प्रशंसापत्र आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून एसपी सर आणि ॲपर एसपी मॅडम यांच्याकडून देण्यात आले.
सदरची कामगिरी अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार विजय खाडे,महिला पोलीस हवा. नकुसाबाई कोळेकर,पोलीस ना.स्वप्नील म्हामणे,महिला पोलीस नाईक नीलम रासकर,पोलीस कॉन्स्टेबल तानाजी चंदनशिवे यांनी केली आहे.
   

No comments:

Post a Comment