मार्गदर्शन करताना निवडणूक निर्णय अधिकारी सौ उज्वला गाडेकर |
सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
गोंदवले: फलटण
खंडाळा वाई सातारा कोरेगाव कराड पाटण जावली या तालुक्यातून आलेले मतदान
अधिकारी यांचे प्रशिक्षण दहिवडी येथील माऊली मंगल कार्यालय व प.म शिंदे
कन्या शाळा दहिवडी या ठिकाणी पार पडले
दिनांक 15 आणि 16 या दोन दिवशी जवळपास दोन हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले
निवडणूक निर्णय अधिकारी सौ उज्वला गाडेकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विकास अहिर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती बाई माने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री वैभव लिंगे तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले
लांबचा
प्रवास करून कंटाळून आलेले मतदान अधिकारी यांना हळूच शाब्दिक चिमटे घेऊन
तहसीलदार विकास अहिर यांनी निवडणूक प्रक्रियेतील बारकावे समजावून दिले प्रशिक्षणासाठी आलेल्या मतदान अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामकाजाचे कौतुक केले
भाषेतील गोडवा आणि आवाजातील जरब स्पष्ट उच्चार हेच सर्व मतदान अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित करून घेत होते पम शिंदे कन्याशाळा ते माऊली कार्यालय या दरम्यान वाहतुकीसाठी बसेस ठेवण्यात आले होत्या जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती
त्याचबरोबर
ज्यांना मतदान करावयाचे आहे त्यांच्यासाठी मतदान कक्ष उभा करून त्यांचे
शंभर टक्के मतदान करून घेण्याची जबाबदारी पार पाडण्यात आली
प्रशासनाकडून नेमून दिलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याने आपली जबाबदारी चोख
पार पाडली त्यामुळे दोन दिवस प्रशिक्षण दरम्यान कसलीही अडचण आली नाही मनुष्यबळ
विभागाचे प्रमुख गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे आणि त्यांचे सर्व सहकारी
यांनी प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांची उपस्थिती घेऊन त्यांना
योग्य मार्गदर्शन केले निवडणूक ही लोकशाही पद्धतीने
पार पडत असताना 258 मधील सर्व मतदारांनी मतदान करावे यासाठी स्वीप अंतर्गत
प्रभारी गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते, शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार
दंडिले, नोडल अधिकारी प्राध्यापक राजेंद्र जगदाळे, नोडल अधिकारी प्राध्यापक
ज्ञानेश काळे यांची टीम सतर्क होती 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत
प्रशिक्षण दरम्यान कन्या विद्यालयातील हॅंडसॉन प्रशिक्षण सुद्धा तितक्याच दर्जेदारपणे संपन्न झाले
प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व मतदार अधिकाऱ्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी सौ उज्वला गाडेकर मॅडम यांनी सर्वाना धन्यवाद दिले.
No comments:
Post a Comment