कोळकीत महिलेच्या धाडसाने चोरटा जेरबंद - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, November 25, 2024

कोळकीत महिलेच्या धाडसाने चोरटा जेरबंद


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा:
फलटण- दहिवडी रस्त्यावरील कोळकीतील संदीप ढाब्याच्या पुढे शारदानगर येथे चालायला निघालेल्या महिलेचे धूम स्टाईलने आलेल्या चोरट्यांनी मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले. मात्र, महिलेने धाडसाने चोरट्याचा शर्ट पकडल्याने दुचाकी घसरून चोरटे खाली पडले. यातील एका चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसरा पळून गेला रोमन राजू भोसले (वय 23, रा. निरावागज, ता बारामती, जि. पुणे, हल्ली रा. माळेगाव साखर कारखाना) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा  अनोळखी चोरटा (वय 19) पळून गेला.
याबाबत माहिती अशी, शारदानगर, कोळकी येथील कल्पना भगवान मोहिते (वय 55) रविवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास चालण्यासाठी जात असताना अचानक पाठीमागून विना नंबरची काळ्या रंगाची स्प्लेंडर दुचाकी आली. त्यावरील पाठीमागे बसलेल्या चोरट्याने मोहिते यांचे मिनी मंगळसूत्र व डोरल्याला जोरात हिसका मारून बळजबरीने तोडले व गाडीवर बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी कल्पना मोहिते यांनी धाडस दाखवून चोरट्याचा शर्ट ओढून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.
या झटापटीत चोरट्यांची दुचाकी घसरून दोघेही चोरटे खाली पडले. घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ तेथे धाव घेत दुचाकीस्वार भोसलेला दुचाकीसह तेथेच पकडले. मात्र, दुसरा चोरटा सोने घेऊन पसार झाला. पोलिसांनी भोसलेला अटक केली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम करत आहेत.

No comments:

Post a Comment