माधव मेंडीगिरि
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
शाहूनगर
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे राज्यात दुसर्या क्रमांकाचे विक्रमी मताधिक्य घेऊन विजयी झाले.
या विजयात सातारा शहराचे उपनगर शाहूनगर येथील मतदारांनी आपल्या परीने खारीचा वाटा उचलला. शाहूनगर येथील एकूण मतदानापैकी 74% मते आ. शिवेंद्रराजे यांना मिळाली.
निवडणुकीआधीपासून शाहूनगर भागात आ. शिवेंद्रराजे यांनी आमदारनिधीतून अनेक विकासकामे राबवली होती. त्याची पोचपावती शाहूनगरवासीयांनी मतदानातून दिली.
निवडणूक काळात सौ. वेदांतिकाराजे भोसले वहिनीसाहेब यांनी शाहूनगरमधील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले होते. कोपरासभा, पदयात्रा यामधून वहिनीसाहेबांनी जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क साधून आ. शिवेंद्रराजे यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते.
खासदार आणि आमदार या दोन्ही राजेगटाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला.
निकालानंतर कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला. यावेळी नागरीकांनी शाहूनगरचे पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, गटारे, रस्त्यावरील दिवे आदी प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा व्यक्त करून आ. शिवेंद्रराजेंना आता मंत्रीपद मिळावे अशी भावना व्यक्त केली.
No comments:
Post a Comment