जेवण बनविण्यावरून रेठऱ्यात महिलेचा खून - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, November 6, 2024

जेवण बनविण्यावरून रेठऱ्यात महिलेचा खून

 

 सातारा,जेवण बनवण्याच्या कारणावरून महिलेला दांडक्याने मारहाण झाली. त्यात त्या महिलेचा खून झाला. रेठरे खुर्द येथे वाठार ते रेठरे जाणाऱ्या मार्गालगत मोहिते मळ्याच्या शिवारात शुक्रवारी रात्री घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सिंधू जाधव (वय ६५, रा. डोंगरसुनी-सावळज, ता. तासगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ऊसतोड कामगार विठ्ठल ज्ञानदेव चौगुले (वय ५२, रा. शिरशी, ता. सांगोला) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेठरे खुर्दच्या जगन्नाथ बापू मोहिते यांचे जनावरांचे शेड आहे. ते वाठार तेरेठरे खुर्दकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या मोहिते मळा नावाच्या शिवारात आहे. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास काही शेतकरी शिवारात गेले असता जगन्नाथ मोहिते यांच्या शेडनजीक एक महिला मृतावस्थेत त्यांना दिसली. त्यांनी त्वरित त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली. तिची ओळखही पटली. तिचे नाव सिंधू जाधव असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. पोलिसांनी चौकशी केली असता जगन्नाथ मोहिते यांच्या शेडजवळ सिंधू जाधव ही महिला ऊसतोड मजूर विठ्ठल चौगुले याच्यासह झोपडीत राहण्यास होती, असे समोर आले.


No comments:

Post a Comment