सातारा, युवकाच्या डोक्यात वीट घालून त्याच्या खिशातील दहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेण्यात आले. जखिनवाडी, ता.
कऱ्हाड येथे ही घटना घडली.
याबाबत जखमी धनंजय विशाल
पुस्तके (वय २३, रा. ओगलेवाडी, सध्या रा. साई मंगल कार्यालय, पाचवड फाटा,
मुनावळे रोड, ता. कऱ्हाड) याने कहऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली
आहे.
. पाचवड फाटा येथे राहणारा धनंजय • पुस्तके हा
युवक एका ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. दोन दिवसांपूर्वी त्याला
त्याच्या आईने गाडीचा हप्ता भरण्यासाठी सात हज़ार रुपये दिले होते. तसेच,
तो ज्या ठिकाणी काम करतो, त्या ठिकाणाहून दिवाळीचा बोनस म्हणून त्याला तीन
हजार रुपये मिळाले होते. हे सर्व पैसेधनंजय याने स्वत:जवळ ठेवले होते.
त्यानंतर रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास धनंजय कऱ्हाडातील मावशीला
भेटण्यासाठी आला होता तेथून परत जात असताना, मलकापूर फाटा येथे वाहतूककोंडी
असल्यामुळे तो कोयना वसाहत येथून पाचवड फाट्याकडे निघाला असताना, जखिणवाडी
रोड येथे अनिकेत पालकर याने त्याला अडवले. शिवीगाळ, दमदाटी करीत त्याने
त्याच्या पँटच्या पाठीमागील खिशात असलेले दहा हजार रुपये काढून घेतले.
तसेच, रस्त्यावर पडलेली वीट उचलून धनंजय याच्या डोक्यात मारली. त्यामुळे तो
गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले
आहे. याबाबतची नोंद कहऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक
रेखा देशपांडे तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment