सातारा
.पर्यटनस्थळी सुट्यांचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दाखल होत आहेत.
मुंबई येथून पर्यटनास आलेल्या माखिजा कुटुंबास चांगलेच महागात पडले.
सोमवारी दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास वेण्णालेक परिसरात फेरफटका
मारण्याच्या उद्देशाने माखिजा कुटुंबीय आपल्या वाहनाने वेण्णालेक येथे आले.
छत्रपती प्रतापसिंह उद्यानासमोर - वनविभागाचे टोल असून, या टोलबाहेर
रस्त्यावर
वाहन लावून उतरत असताना पार्किंग करण्यावरून पर्यटक व टोलधारक
यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. या
हाणामारीत टोलधारकाच्या बाजूने काहींनी सहभाग घेतला असल्याचे बघ्यांनी
सांगितले. या हाणामारीत दगड, लाथा- बुक्क्यांनी मारहाण झाली असल्याची
माहिती मिळाली. वेण्णालेक परिसरात ऐन गर्दीच्या वेळीच मुख्य रस्त्यावर
झालेल्या या मारहाणीमुळे इतर पर्यटकांमध्ये मात्र घबराट पसरलीहोती.या
मारहाणीमध्ये पर्यटक शम्मी नंदलाल माखिजा (वय ६०), दर्शन • दीपक रोहिरा
(४५), हंसराज शम्मी माखिजा (३६), निहाल नंदलाल माखिजा (४८), सागर शम्मी
माखिजा (३५), रौनक निहाल माखिजा (२१, सर्व रा मुंबई) हे जखमी झाले. जखमींवर
महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेची नोंद
महाबळेश्वर पोलिस ठाण्यामध्ये रात्री झाली आहे.
No comments:
Post a Comment