गेल्या १५ वर्षात एकीकडे आ. जयकुमार गोरेंमुळेच खटाव तालुक्यातील गावोगावी विकासपर्व उभे राहिले आहे. तालुक्यात ११ वर्षांपूर्वीपासून उरमोडीचे पाणी येत आहे. जिहेकठापूरचे पाणीही त्यांच्याच प्रयत्नांमुळे आले आहे. आता तालुक्यातील मायणी, कलेढोणसह वंचित गावांसाठी टेंभू योजनेची कामे सुरु झाली आहेत. दुसरीकडे तालुक्यातील महाविकास आघाडी म्हणजे भ्रमनिरास असल्याची टीका कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना डॉ. देशमुख पुढे म्हणाले , मी आ. गोरे यांच्याबरोबर काम करत होतो तेव्हा पंचायत समिती सदस्य, सरपंचपदावर काम करायची संधी मिळाली. आमदारांच्या माध्यमातून गावोगावी रस्ते, पाणी,वीज अशा कामांसह जनतेच्या इतर समस्या सोडविता आल्या. कार्यकर्त्यांना पाठबळ देता आले. राजकीय बदलांमुळे मध्यंतरी आ. गोरेंपासून दूर व्हावे लागले होते. त्या कालावधीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून अपेक्षित कामे करता आली नाहीत. खटाव तालुक्याच्या अस्मितेच्या बाता मारणाऱ्यांबरोबर राहिलो तेव्हा आमचा भ्रमनिरास झाला. त्यांच्याकडून विकासकामांची अपेक्षा ठेवणे गैर आहे हे आम्हाला समजले. महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्यातच धन्यता मानतात. प्रत्येकाचा सवता सुभा असल्याने ते एकसंघ तालुक्याचा विचारच करु शकत नाहीत.
खटाव तालुक्याचा सर्वांगीण विकास आ. जयकुमार गोरेंनीच साधला आहे. औंधसह वीस गावांची पाणी योजना मार्गी लावण्याची धमक फक्त आ. गोरेंमध्येच आहे. आम्हाला त्यांच्याशिवाय पर्यायच नाही. जनतेलाही आ. गोरेंचे कर्तुत्व चांगलेच माहित असल्याने विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचा भ्रमनिरास करण्यात खटाव तालुका महत्वाची भूमिका निभावणार असल्याचेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment