वडिलांचा अमेरिकेत महिनाभर मुक्काम,२२ दिवसांनंतर पोटात अन्न; हॉस्पिटल व्यवस्थापनाने योजनेत बसवला खर्च
सातारा,
ता.8 :अमेरिकेत भीषण अपघात होऊन कोमात गेलेल्या लेकीला वाचवण्यासाठी
वडिलांचं काळीज तुटतयं, पायाला भिंगरी लावून ते वैद्यकीय तज्ञांच्या
हातापाया पडत आहेत. वडिलांची ही आर्त हाक अमेरिकन डॉक्टरांच्या हृदयाचा ठाव
घेत असून ज्या रुणालयालात नीलमवर उपचार सुरू आहेत, त्यांनी नीलम साठी
युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आता नीलमच्या पोटात अन्न जावू लागल
असून एमआरआयमध्येही थोडीसी प्रगती दिसून येत असल्याचे तेथील डॉक्टरांनी
वडिलांचा अमेरिकेत महिनाभर मुक्काम आहे.
नीलमच्या
वडिलांची तब्येतीची तक्रार आहे. त्यातच अमेरिकेत सध्या थंडीची लाट आहे.
त्यामुळे तेथील वातावरणाचा त्यांना त्रास होवू लागला आहे. तसेच
त्यांच्यासोबत गेलेला गौरव कदम यालाही त्रास झाला. काही दिवसांत तो भारतात
परतणार आहे. पंरतु, नीलमचे वडील तानाजी शिंदे हे महिनाभर तिथे राहून भारतात
परतणार आहेत. त्यानंतर गरज लागल्यानंतर पुन्हा त्यांना अमेरिकेत बोलवले
जाणार आहे.
सोमवारी (दि. ३) मार्च रोजी स्थानिक
वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजता नीलमचे वडील तानाजी शिंदे हे अमेरिकेतील
सॅक्रामेंटोमध्ये दाखल होताच त्यांनी मध्यरात्री थेट हॉस्पिटल गाठून नीलमची
पाहणी केली. तिची अवस्था पाहून अक्षरशः त्यांना रडू कोसळले. बाप माणूस रडत
होता, तेव्हा रुग्णालयातील स्टाफ व व्यवस्थापनाचे डोळे पाणावले होते.
कोमात असलेल्या लेकीला वडिलांनी हाक मारली, तेव्हा नीलमने पापण्यांची
हालचाल केली. तिचा श्वासोच्छ्वास वाढला. तिच्या या हालचालीची दखल तेथील
उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घेत नीलमच्या उपचाराच्याअनुषंगाने आवश्यक माहिती
वडिलांना दिली व त्यानंतर युद्धपातळीवर रुग्णालयाने उपचाराला सुरुवात केली
आहे.
तेथील डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले की,
नीलम वर लाँग टर्म ट्रीटमेंट करावी लागणार आहे. सध्यस्थितीत आणखी दोन-तीन
महिने उपचार करावे लागतील, तो पर्यंत हॉस्पिटलच सर्व प्रकारची काळजी घेणार
असून नातेवाईकांना फक्त बघण्याची मुभा आहे. नुकत्याच झालेल्या एमआरआयमध्ये
नीलमच्या ब्रेनमधील काही सेलमध्ये थोडीसी प्रगती आढळून आली आहे. पंरतु,
तिच्या ब्रेन वर प्रेशर राहत आहे. यात सुधारणा होण्यासाठी वेळ लागणार आहे.
दरम्यान, नीलमच्या पोटात अन्न जाण्यासाठी अन्न नलिकेव्दारे फीडींग देण्यास
सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, ती केव्हा शुद्धीवर येईल, हे सांगता येत
नाही. शुद्धीवरयेईपर्यंतची काळजी रुग्णालय घेणार आहे. उपचारानंतर नीलम
व्हिल चेअरवर येईल, तेव्हाच तिला मदतीसाठी नातेवाईकांची गरज लागणार आहे.
तसेच रुग्णालय व्यवस्थापनाने नीलमचे उपचार योजनेमध्ये बसवले असून तिच्या
वडिलांच्या राहण्याचीही सोय केली आहे.
उच्च
शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या कराड तालुक्यातील वडगाव (उंब्रज) गावच्या
नीलम तानाजी शिंदे या तरूणीचा काही दिवसांपुर्वी भीषण अपघात झाल्याने ती
कोमात गेली आहे. दहा-बारा दिवसांच्या प्रयत्नानंतर इमर्जन्सी व्हिसा मिळताच
तानाजी शिंदे लेकीला भेटण्यासाठी अमेरिकेत पोहोचले. सोमवारी ३ मार्चला
स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजता तानाजी शिंदे सॅक्रामेंटोमध्ये
दाखल होताच त्यांनी थेट हॉस्पिटल गाठलं. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील
सॅक्रामेंटो शहरात १८ दिवसांपूर्वी कार अपघात नीलम शिंदे ही तरूणी
गंभीररित्या जखमी झाली. तिच्यावर युसी डेव्हिस मेडिकल सेंटरमधील अतिदक्षता
विभागात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर सुमारे २२
दिवसांपासून नीलम कोमात आहे. तिचे दोन्ही पाय व एका हाताची अजिबात हालचाल
होत नाही. तिची तब्येत ढासळली असून वजन मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे.
डोक्याला इजा झाल्याने केस काढण्यात आले असून २२ दिवसांपासून तिच्या पोटात
अन्न गेलेले नव्हते. पंरतु, तिचे वडील तिथे पोहचवल्यानंतर उपचाराच्या
अनुषंगाने हॉस्पिटल व्यवस्थापनाशी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. सध्या नीलमच्या
पोटात अन्न जाण्यासाठी अन्ननलिकेतून फिडींग देण्यास सुरुवात करण्यात
नातेवाईकांना सांगितले. पंरतु, ट्रीटमेंटला आणखी दोन ते तीन महिन्यांचा
कालावधी लागणार असल्याचेही डेव्हिस मेडिकल सेंटर व्यवस्थापनाकडून सांगण्यात
आले आहे.
0 Comments