रेल्वेमध्ये नोकरीस लावतो म्हणून गंडा घालणाऱ्या संशयित आरोपीस वडूज
पोलिसांनी तांब्यात घेतले आहे. दादासा लक्ष्मण रणनवरे (रा. दसूर, ता.
माळशिरस, जि. सोलापूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव
आहे.याबाबत वडूज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मे २०२२ मध्ये येरळवाडी
(ता. खटाव, जि. सातारा) येथील सोमनाथ धोंडिराम बागल यास रेल्वेमध्ये नोकरी
लावतो म्हणून एक लाख रुपये संशयित दादासो लक्ष्मण रणनवरे याने ऑनलाईन
स्वरुपात पैसे घेतले. मात्र नोकरीस न लावता फसवणूक केल्याने वडूज पोलिसांत
सोमनाथ बागल यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान,
गुन्हा नोंद झाल्यापासून संशयित पोलिसांना गुंगारा देऊन वेगवेगळ्या
शहरामध्ये राहत होता. त्याचे निश्चित असे राहण्याच्य ठिकाणाबाबत माहिती
मिळत नव्हती
अथवा त्याच्याबाबत उघडपणे काही माहिती मिळून येत नव्हती.
पोलिसांनी
त्याच्या मोबाईलच्या तांत्रिकमाहितीच्याआधारे व व ओला उबेरं प्रवासी
वाहतूक कंपनीतून माहिती घेऊन त्यास ३ मार्च रोजी पहाटे सहाच्या सुमारास
कोंढवा (पुणे) येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे.संशयिताने आणखी कोणाची
फसवणूक केली असल्यास वडूज पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन
पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर
शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, दहिवडी उपविभागीय पोलीस
अधिकारी अश्विनी शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली .. पोलीस निरीक्षक घनश्याम
सोनवणे, उपनिरीक्षक अमित शिंदे, हवालदार -शिवाजी खाडे, कॉन्स्टेबल गणेश
शिरकुळे, हवालदार महेश काटकर यांनी केली आहे.
0 Comments