Ticker

6/recent/ticker-posts

संतोष देशमुख यांच्या अंगावर १५० व्रण

संतोष देशमुख यांना मारहाण केलेल्या हत्याराचे रेखाटन सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्रातून न्यायालयासमोर सादर केले.

संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकरिता सुदर्शन घुले यांच्या साथीदाराने वेगळीच हत्यारे वापरली. या हत्याराचे रेखाटन सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्रातून न्यायालयासमोर सादर केले आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची दि. ९ डिसेंबररोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. देशमुख यांचा मृतदेह ज्यावेळी आढळून आला. त्यावेळी मृतदेहावर दीडशेहून अधिक लहान, मोठे व्रण असल्याचे समोर आले होते. बेदम मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. अमानुष पद्धतीने क्लच वायर, गॅस पाईप, लोखंडी पाईप तसेच पीव्हीसी पाईपने संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या अंगावर हे व्रण उमटल्याने संपूर्ण त्वचा काळी निळी पडली होती.
सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी हे वेगळेच प्रकारचे हत्यार तयार केले होते. त्या हत्याराच्या माध्यमातून देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती. ही हत्यारे नेमकी कशा पद्धतीची होती. याचे रेखाटन सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी तयार करून न्यायालयात सादर केले आहे.

Post a Comment

0 Comments