Ticker

6/recent/ticker-posts

फलटणला कार्यालयातून सहा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला


 
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

फलटण :  येथील तांबमाळ  गावच्या हद्दीतून सूर्याजी गार्डन कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल सहा लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. दि. ११ रोजी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. 

याप्रकरणी आशा भरत लोहाना (वय ५२, रा. कोळकी, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

दि. ११ रोजी  रात्री लोहाना यांचा मुलगा ऋषभ याच्या लग्नाचे रिसेप्शन होते. त्या कार्यक्रमादरम्यान, चोरट्यांनी ३६ हजारांची ३ ग्रॅम ३३० मिलीग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले, ४ लाख ४२ हजार ८९ रुपयांची ४० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या चेनमधील गंठण व गोल पेन्डन्ट, ७ हजा ९३६ रुपये किमंतीचे कानातील टॉप्स, ६१ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी व पेन्डन्ट, ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल व ४५ हजार रुपये रोख असा  ५ लाख ९७ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. 

या चोरीनंतर कार्यालय परिसरात व लोहाना यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. रात्री उशिरा लोहाना यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. हवालदार चव्हाण अधिक तपास करत आहेत. 

Post a Comment

0 Comments