Ticker

6/recent/ticker-posts

निवडणूक चिन्ह मिळण्यास विलंब....अपक्षांची गोची... तर आमचं ठरलंय वाले जोमात....

महाबळेश्वर : आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारांची मोठी गोची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक चिन्ह वाटप प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे अनेक अपक्ष उमेदवारांना अजूनही आपले अधिकृत चिन्ह हाती मिळाले नसल्याची माहिती समोर येत आहे.

चिन्ह उशिरा मिळाल्यामुळे प्रचाराचा वेग वाढवताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मतदारांपर्यंत आपले चिन्ह पोहोचवणे ही आता तारेवरची कसरत ठरणार आहे. विशेषतः विस्तृत प्रभाग आणि ज्या विभागात घराघरांत जाऊन संपर्क करणे आवश्यक आहे, त्या ठिकाणी या विलंबाचा परिणाम अधिक जाणवणार आहे.

अपक्ष उमेदवारांना मुद्रित प्रचार साहित्य, पॅम्प्लेट, बॅनर्स, पोस्टर्स तयार करण्यातही विलंब होणार असून, प्रचाराची दिशा आणि रणनीती ठरवणे कठीण बनले आहे. दरम्यान, चिन्हांवरील गोंधळामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी उमेदवारांकडून अतिरिक्त मेहनत घेतली जात आहे.

निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू असताना, चिन्ह उशिरा मिळाल्याचा अडथळा पार करून मतदारांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे हेच आता अपक्षांसमोरील सर्वात मोठं आव्हान बनलं आहे.

Post a Comment

0 Comments