औंध: कुरोली येथील सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेत हनुमान आखाडा पुणे येथील पै. माऊली कोकाटेने दमदार खेळाची पराकाष्ठा करत विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्याने आर्मी सेंटर पुणे येथील पै. सुरज चौधरीवर मात करत मानाची गदा आणि ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळवले. या सोहळ्याला योगेश फडतरे, अंकुश गोरे, अभयसिंह जगताप, पिंटूदादा मांडवे, शुभम शिंदे, हणमंतराव शिंदे, अमर देशमुख, विवेक देशमुख, माजी महाराष्ट्र केसरी पै. धनाजी फडतरे, पै. अमोल फडतरे, पै. मंगेश फडतरे, आदि मान्यवर उपस्थित होते.
औंध जिल्हा परिषद गटाचे उगवते नेतृत्व आणि युवा उद्योजक योगेश संभाजीराव फडतरे यांनी प्रथम क्रमांकाच्या कुस्ती विजेत्याला ५ लाख रुपयांचे बक्षीस देऊन खेळाडूंना मोठी प्रेरणा दिली. मैदानातील लहान-मोठ्या कुस्त्यांना देखील बक्षिसाव्यतिरक्त १ हजारांपासून १० हजारांपर्यंतची अतिरिक्त प्रोत्साहन बक्षिसे देण्यात आली. कुरोलीची यात्रा आणि कुस्तीचे मैदान मान्यवर आणि प्रेक्षकांनी गजबजून गेले होते. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहत असलेने इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते यांचीही उपस्थिती मैदानात दिसून आली. कुरोलीच्या कुस्ती मैदानाला प्रथम क्रमांकाचे 5 लाखांचे रोख बक्षीस आणि मानाची गदा योगेश फडतरे यांनी दिली, तर अंकुश गोरे यांनी 2 लाख रुपयांचे बक्षीस दिले. अभयसिंह जगताप यांनीही मानाची गदा आणि रोख स्वरूपात अनेक बक्षिसे दिली. मैदानात रंगलेल्या झुंजींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. कुरोलीच्या पारंपरिक मैदानाने यंदाही कुस्तीप्रेमींसाठी ताकदीचा, थरारक आणि उत्साही सोहळा घडवला.

0 Comments