Hot Posts

6/recent/ticker-posts

आता कामाला लागा, सातारकरांची अपेक्षा.

सातारा: तब्बल नऊ वर्षांनंतर सातारा नगरपालिकेची निवडणूक अखेर पार पडली असून - प्रशासकीय - संपला आहे. जनतेने दिलेल्या कौलातून आता पालिकेला नवा कारभारी मिळाला असून शहराच्या कारभाराची सूत्रे पुन्हा - लोकप्रतिनिधींच्या हाती आली आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाल्याने सत्ताधाऱ्यांकडून सातारकरांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत.

गेल्या प्रशासकीय रखडलेली अनेक वर्षात कारभारामुळे विकासकामे, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था,कचरा व्यवस्थापन, वाहतूक वच्छता आणि शहर नियोजन कोंडी, अतिक्रमण, ड्रेनेज, स असे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. निवडणूक काळात या सर्व असून आता ती प्रत्यक्षात उतरवण्यांची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर आहे.
विजयानंतर हार, तुरे, सत्कार, मिरवणुका आणि जल्लोषात अडकून न पडता तातडीने कामाला लागणे, हीच सातारकरांची स्पष्ट अपेक्षा आहे. शहरातील मूलभूत सुविधा सुधारण्याबरोबरच दीर्घकालीन विकास आराखडा, वाढत्या लोकसंख्येचा विचार, वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पालिकेतील अपक्षांची संख्या ठरणार आहे. अस्तित्व लक्षात घेता समन्वय आणि वेगवेगळ्या गटांचे साधत निर्णय घेणेही तितकेच महत्त्वाचे शहरहिताला प्राधान्य दिल्यासच जनतेचा विश्वास टिकून राहील. निवडणुकीत दिलेला कौल हा केवळ सत्ता देण्यासाठी नसून काम करून दाखवण्यासाठी आहे, हे नवे पदाधिकारी विसरणार नाहीत, अशी अपेक्षा सातारकर व्यक्त करत आहेत.आता निवडणूक संपली आहे. उत्सवही संपला पाहिजे. शहराच्या विकासासाठी प्रत्यक्ष कामाला लागण्याची वेळ आली आहे, अशीच भावना सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments