सत्य सह्याद्री/सातारा
मैत्री व ओळखीतून मुलाच्या एमबीबीएस शिक्षणासाठी दागिने व रक्कम असे २१ लाख रुपये घेऊन ते परत न दिल्याप्रकरणी प्रगती महिला कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्षा अलका प्रवीण पाटील (रा. २५९, रॉयल आर्केड, शनिवार पेठ, सातारा) यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सेवानिवृत्त गटविकास अधिकारी इंदिरा कोळी (वय ५३, रा. चारभिंती, सातारा) यांनी फिर्याद दिली. पाटील यांनी ओळखीतून कोळी यांच्याकडून सोन्याचा बदाम, सोन्याचे टॉप्स, सोन्याची चेन, कर्णपुले, सोन्याची तीन वेढणी, सोन्याचे राणीहार, सोन्याच्या बांगड्या, सोन्याच्या पाटल्या, सोन्याचा नेकलेस असे २५० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच चेक व ॲानलाईन पद्धतीने ८ लाख रुपये असे २१ लाख २६ हजार २६८ रुपयांचा मुद्देमाल घेतला व तो परत केला नाही, असे असे फिर्यादीत म्हटले आहे.
तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.

0 Comments