Ticker

6/recent/ticker-posts

महाबळेश्वरला व्हेल माशाची उलटी जप्त :वेण्णा लेक परिसरात कारवाई

 

महाबळेश्वर शहर परिसरातील वेण्णा लेक व मेटतळे परिसरात अंबर ग्रीस (व्हेल माशाची उलटी ) तस्करी प्रकरणी महाबळेश्वर वन विभागाने मोठी कारवाई करून पाच किलो तीनशे ग्रॅम उलटी जप्त केली आहे .या दुर्मिळ वस्तूची किंमत कोट्यवधी रुपये असून याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे

अतुल अशोक विश्वासराव राहणार ठाणे,आकाश शामसुंदर धुरी राहणार मालवण जिल्हा सिंधुदुर्ग,एक्झम क्लेमेंट फर्नांडिस राहणार मालवण,हितेंद्र मनोहर शेट्ये ,राहणार लालबाग परळ ,कौस्तुभ मिलिंद प्रभू राहणार धनकवडी पुणे,मोहन हरिभाऊ पाटील राहणार भावेघर ठाणे,विल्सन झुजे फर्नांडिस राहणार मालवण या सात जणांना मुद्दे मला सकट पकडण्यात आले आहे त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलम 2 9 39 44 48 व 51 नुसार वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे .अंबर ग्रीस तस्करी प्रकरणी इतर आरोपींचा सहभाग आहे काय याबाबतचा अधिक तपास वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते महाबळेश्वर हे करत आहेत .

दिनांक पाच मार्च रोजी सहाय्यक वना संरक्षक सातारा यांना अंबर ग्रीस याची तस्करी महाबळेश्वर परिसरात होणार असल्याची गोपनीय खबर मिळाली होती त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक पथक व वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण या पथकांनी वेण्णालेख आणि मेट तळे या परिसरात सापळा रचून तीन वाहनांची तपासणी केली .यातील एका वाहनांमध्ये व्हेल माशाच्या उलटी सदृश्य मुद्देमाल आढळून आला .त्याची पाच किलो तीनशे ग्रॅम किंमत असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे अंबरगिरी हे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अनुसूची एक मध्ये समाविष्ट असून त्याची विक्री अवैध वाहतूक करणे हा गुन्हा असून त्याकरता सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद असून पाच लाख रुपये दंडाचे प्रावधान आहे .या प्रकरणाची अधिक तपासणी करण्यात येत आहे

महाबळेश्वरचे वनपरिक्षेत अधिकारी महादेव मोहिते यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे सुनील लांडगे वनपाल तुकाराम निकम बाबू मराठे देवेंद्र पवार अविनाश गवळी इत्यादींनी या कारवाईत सहभाग घेतला होता

Post a Comment

0 Comments