Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात दोन युवकांच्या आत्महत्या


 

किडगाव येथे युवकाची आत्महत्या

सत्य सह्याद्री/सातारा

किडगाव, ता. सातारा येथील आदित्य रामदास पिसाळ (वय १९) याने रहात्या घराशेजारीला गोठ्यात कासऱ्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नेमके कारण समजू शकले नाही. हणमंत लक्ष्मण पिसाळ (वय ६५ ) यांनी खबर दिली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

भालेघरच्या युवकाची लोणंदमध्ये आत्महत्या

सत्य सह्याद्री/लोणंद

मूळच्या भालेघर, ता जावळी येथील रहिवाशी असलेल्या श्रीराम दत्तात्रय पवार (वय २६) याने लोणंद येथे भाड्याने रहात असलेल्या रुमच्या सिलिंगच्या लोखंडी हुकाला कापडी स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. नेमके कारण समजू शकले नाही. दत्तात्रय रामचंद्र पवार (वय ५७) यांनी खबर दिली. लोणंद पोलीस ठाण्यात नाेंद झाली आहे. 

Post a Comment

0 Comments