Ticker

6/recent/ticker-posts

माळशिरस तालुका महसूल सेवक संघटनेची नूतन कार्यकारिणी बिनविरोध, जावेद मणेरी यांची अध्यक्षपदी निवड

 


महसूल दिनी नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा

माळशिरस | प्रतिनिधी

महसूल दिनाचे औचित्य साधून माळशिरस तालुका महसूल सेवक संघटनेची नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. यावेळी विद्यमान तालुकाध्यक्ष जालिंदर वाघंबरे यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीनुसार जावेद इनुस हमीदा मणेरी यांची अध्यक्षपदी, शहाजी हंकारे यांची उपाध्यक्षपदी, विश्वास बनकर यांची सचिवपदी, नवनाथ गेजगे यांची सहसचिवपदी, हनुमंत पिसे यांची खजिनदारपदी, तर दत्तात्रय साठे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली.

तसेच सौ. मनीषा शिंदेसौ. शीतल जगताप यांची महिला सदस्य म्हणून, संजय डावरे, सुनील ठोंबरे, विश्वनाथ बोडरे, अनंता इंगळे आणि नानासो करडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. शब्बीर शेख यांच्याकडे संघटक, कैलास नामदास यांच्याकडे प्रसिद्धीप्रमुख, तर बाळासाहेब सरवदे यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली.

नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर संघटना प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments