रहिमतपूर : निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून एका युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी मुकंदर दिलावर शेख (वय ३०, रा. जिहे, ता. सातारा) यास न्यायालयाने दोन वर्षे सक्त कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
दि. २२ जुलै २०१८ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सायगाव–धामणेर हद्दीत कॅनॉल पुलावर हा अपघात घडला होता. फिर्यादी धनराज जठार हे आपल्या मित्रांसह दुचाकीवरून जात असताना आरोपीने भरधाव वेगाने येत धडक दिली. या अपघातात कृष्णात भोसले (वय २४) यांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले होते.
या प्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास करण्यात आला. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यादरम्यान एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. सादर पुरावे व साक्षी ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपीस मुख्य गुन्ह्यासाठी दोन वर्षे सक्त कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची तरतूदही करण्यात आली आहे.
0 Comments