Ticker

6/recent/ticker-posts

होळीचागाव येथे युवकाची गळफास घेवून आत्महत्या


वडूज

होळीचागाव (ता. खटाव) येथील  जयदिप सुखदेव देशमुख (वय:४०) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मयत जयदिप हा उच्च शिक्षित असून निमसोड येथे क्लासेस घेण्याबरोबर भाजीपाला व्यापारही करत होता.
सोमवार दि. 30 रोजी रोजी सकाळी 10.00 वा.चे.सुमारास मौजे होळीचागाव  गावचे हद्दीतील देशमुखमळा येथे बबन नारायण देशमुख याचे शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदिला   जयदिप  देशमुख   याने कोणत्यातरी अज्ञात कारणाने गळफास लावुन घेवुन मयत झाला आहे.  याबाबत मयताचा भाऊ विक्रम देशमुख याने  मायणी पोलीस दुरक्षेत्रास खबर दिली.
पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे,  सहायक निरीक्षक विक्रांत पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार श्री. जगदाळे अधिक तपास करत आहेत. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी मयत देशमुख यांनी अगोदरच भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेट्स ठेवल्याची चर्चा आहे. त्यांनी नक्की का आत्महत्या केली? याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments