Ticker

6/recent/ticker-posts

आजच्या पोलीस डायरीतील नोंद ६ मार्च २०२६


 
पार्किंग मधून दुचाकीची चोरी

सातारा शहरातील ११४/अ श्रीराम सहवास अपार्टमेंट व्यंकटपुरा पेठ येथील पार्किंग मधून हँडल लॉक करून पार्क केलेली १३ हजार रुपये किमतीची पर्पल रंगाची होंडा कंपनीची स्कूटर मोपेड गाडी ही अज्ञात चोरट्याने दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संमतीशिवाय चोरून नेली आहे. याप्रकरणी गुलाब अण्णा यादव (वय ७० वर्ष,राहणार व्यंकटपुरा पेठ सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार काटकर करत आहेत



साताररोड येथून २० वर्षीय तरुणी बेपत्ता

सातार रोड येथे राहणारी भक्ती किरण गाढवे (वय२० वर्ष) ही तरुणी जैतापूर येथील सावकार कॉलेज परिसरातून कोणास काही न सांगता कुठेतरी निघून गेली आहे. याबाबतची मिसिंगची फिर्याद वडील किरण पोपटराव गाढवे (वय ५१ वर्ष) यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.


बिल्डिंग मेंटेनन्स कारणावरून एकाला मारहाण

खेड येथील सुभद्राकुंज अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये बिल्डिंगच्या मेंटेनन्सच्या कारणावरून अजय रामचंद्र माने (वय ५८ वर्ष) यांना त्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या कृष्णांत दिनकर जाधव आणि त्यांचा भाऊ व पुतण्यासह इतर दोन अनोळखी व्यक्तींनी लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले आहे.ही घटना दि २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३६ वाजता घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अजय माने यांनी दि ५ मार्च रोजी फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करत आहेत

अपशिंगे येथे दारूच्या बाटल्या जप्त


अपशिंगे येथे आंबेडकर भवनच्या जवळ अनिल मोहिते यांच्या बंद घराच्या आडोशाला बोरगाव पोलिसांनी छापा टाकून देशी दारूच्या १६८० रुपये किमतीच्या ९० मिलीच्या एकूण ४२ काचेच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी आदित्य विनोद मोहिते वय 20 याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल सुमित आनंदराव साळुंखे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments