Ticker

6/recent/ticker-posts

दहिवडी नगराध्यक्षपदी वर्षाराणी सावंत विराजमान*

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क

गोंदवले:
दहिवडी ता. माण येथे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी वर्षाराणी बाळासाहेब सावंत यांनी पदभार स्वीकारला. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्या उपस्थितीत त्यांनी नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी दहिवडी नगरपंचायतीतील नगरसेवक, माजी नगराध्यक्षा, दहिवडीतील नागरिक आणि विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगराध्यक्ष पदासाठी दाखल उमेदवारी अर्जांपैकी इतर उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे सावंत यांची निवड निश्चित झाली होती. त्यामुळे त्यांच्या निवडीची केवळ औपचारिक घोषणा बाकी होती. प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी वर्षाराणी सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांनी अखेर पदभार स्वीकारला.

फोटो ओळी :
दहिवडी नगरपंचायतीत पदभार स्वीकारल्यानंतर नूतन नगराध्यक्षा वर्षाराणी सावंत यांचा सत्कार करताना मान्यवर...

Post a Comment

0 Comments