Ticker

6/recent/ticker-posts

वेळेत नेर तलावाचे पाणी सोडले नाही तर जल समाधी घेणार:धीरज जाधव



पुसेगाव: खटाव  तालुक्याच्या उत्तर भागातील नेर तलावाचे  पाणी येरळा नदीत तसेच   कॅनाॅल  मधून तत्काळ सोडावे,  अशी मागणी करून  येत्या 2 दिवसात  पाणी न सोडल्यास  नेर तलावातील जलाशयात दिनांक 5 में रोजी जल समाधी आंदोलन करण्याचा इशारा, नेर तलाव पाणी बचाव संघर्ष समिती चे नेते, धीरज जाधव  यांनी प्रसिद्धि  पत्रकाद्वारे दिला आहे.

 खटाव तालुक्यातील नेर धरणात सध्या  पूरेसा  जलसाठा आहे परंतु हे पाणी मुळ लाभ क्षेत्राला वंचित  ठेऊन माण तालुक्यातील  आंधळी धरणात सोडण्यात येत आहे.  मूळ लाभ क्षेत्रातील  नेर, पुसेगांव, काटकरवाडी,  विसापुर, भांडेवाडी,  खातगुण, खटाव, भुरकवडी   या  गावातील पिण्यासह  शेती पाण्याचा प्रश्न  अत्यंत गंभीर झाला आहे. या प्रश्नांसाठी अनेक समाजिक व राजकीय संघटनांनी   आंदोलने करून देखील  शासन व पाटबंधारे विभाग  याकडे लक्ष देत नाही.नेर तालुक्यातील जनतेचा या पाण्यावर अग्रक्रमाने हक्क आहे, म्हणून शासनाचे लक्ष वेधून सदर चा प्रश्न सोडवण्यासाठी   आपण जलसमाधी  आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.  असं लोकनेते धीरज जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.  

 आंधळी धरणातील पाणी  साठा  अंत्यंत कमी असल्याचे कारण देऊन  नेर तलावातील पाणी  थेट बोगद्यातुन आंधळी धरणात 100 ते  120 क्यूसेक्स  ने सायपन  पद्धतीने जात आहे. 

 जिहे कटापुर योजनेचे  3 पंप  हाऊस पैकी  1 पंप हाऊस बंद असल्याने  पाणी  पुरठ्यात तूटवडा निर्माण होत असल्याचे  जिहे -कटापुर उपसा जलसिंचन  योजनेच्या कार्यालयाकडून  सांगीतले जात आहे.  

निवडणुकीपूर्वी पाणी सोडण्याचे नाटक करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा  डाव कोणी केला.हे आता मतदारांच्या लक्षात आले आहे.नेर तलावातील उपलब्ध पाण्याचे वितरण व्यवस्था  योग्य प्रकारे केली असती तर  खटाव आणि माण  दोन्ही  तालूक्यात  गरजेनुसार   पुरेसा पाणी पुरवठा करता आला असता.बेजाबदारपणे पाणी  पुरवठा विस्कळीत करून शेतकऱ्यांवर अन्याय करणारांची चौकशी  करण्यात यावी, अशी मागणी नेर तलाव  पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने धीरज जाधव यांनी  केली आहे.

Post a Comment

0 Comments