पोलीस असल्याचे सांगून साडेतीन तोळ्यांच्या बांगड्या लंपास
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण: आम्ही पोलीस आहोत, पुढे चोरी झाली आहे, असे सांगत दोघा तरुणांनी फलटणला महिलेची सव्वा लाखांची लूट केली. आमदार सचिन पाटील यांच्या बंगल्यासमोर शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शोभा विनायकराव खलाटे (वय ७१, रा. गोळीबार मैदान) यांनी फिर्याद दिली. सकाळी खलाटे या व्यायामासाठी चालत गेल्या असताना आमदार पाटील यांच्या बंगल्यासमोर ३० ते ३५ वयाचे दाेन इसम आले. त्यांनी आयकार्ड दाखवून मी पोलीस आहे. पुढे चोरी झालेली आहे. सोने चांदी घालण्यास इथे अलाउड नाही.
तुम्ही बांगड्या काढा व घरी गेल्यावर घाला, असे सांगत हात चलाखीने दुसऱ्या मेटलच्या बांगड्या खलाटे यांच्या पदरात बांधून फसवणूक केली. ३४ ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.

0 Comments