Ticker

6/recent/ticker-posts

सासपडेत सरकारी गायरान जागेवर घरकूलाचे अतिक्रमण

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क | सातारा

सातारा तालुक्यातील सासपडे येथे सरकारी गायरान जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकूल बांधून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पंकज मोहनराव यादव यांनी मुख्यमंत्री, ग्राम महसूल अधिकारी अन ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली आहे.

पंकज यादव यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सासपडे येथील गट क्रमांक १७४५/१ प्लॉट क्रमांक ८१ या उताऱ्यावर महाराष्ट्र शासन मालक सदरी असलेली गायरान जमीन आहे. या जागेवर संजय लक्ष्मण यादव यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल बांधल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सरकारी जागेवरील हे अतिक्रमण हटवून संबंधित बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. यासंदर्भात पंकज यादव यांनी माहिती अधिकारात ग्रामपंचायतीकडे कागदपत्रांची मागणी केली होती. सुरुवातीला कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. नंतर संबंधित कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर ती जोडून मुख्यमंत्री तसेच संबंधित विभागांकडे निवेदने पाठविण्यात आली आहेत.

या प्रकरणामुळे सासपडे परिसरात चर्चा सुरु असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments