Hot Posts

6/recent/ticker-posts

यमाईदेवीच्या दर्शनासाठी रेकाँर्डब्रेक गर्दी;दर्शनासाठी भाविकांच्या रांगा


औंध (वार्ताहर):-महाराष्टासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या औंध येथील मूळपीठ डोंगरावरील श्रीयमाईदेवीच्या दर्शनासाठी मंगळवारी भाविकांनी मूळपीठ डोंगरावर रेकाँर्डब्रेक उंचाकी गर्दी केली होती. रविवारी ही भाविकांनी रेकाँर्डब्रेक गर्दी केली होती. यावेळी मूळपीठ डोंगरावर जाणारे रस्ते चारचाकी वाहनांनी हाऊसफुल्ल झाले होते. 
  राज्यातील प्रमुख शक्तिपीठापैकी  औंधची श्रीयमाईदेवी ओळखली जाते.मागील काही वर्षात देवीचे वाढते आध्यात्मिक महत्त्व पाहता दिवसेंदिवस भाविक,पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. नवरात्रोत्सवातील मंगळवारी पाचवी माळ असल्याने राज्यासह ,परराज्यातून  मोठ्या प्रमाणात भाविकांनी मूळपीठ डोंगरावर देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांना रांगेतूनच दर्शन दिले जात होते. मंदिरापासून ही रांग सुमारे  एक किमी लांब रस्त्यावर  खाली वळणमार्गापर्यंत लागली होती. यावेळी भाविकांमध्ये महिला, नागरिक, युवकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी भाविकांसाठी ठिकठिकाणी पाणी वाटप,चहाप्रसाद वाटपाची सोय करण्यात आली होती. तसेच भाविकांसाठी प्रसाद ,हार,फुले विक्रीचे स्टाँल्सही उभारण्यात आले होते .यावेळी अनेक भाविकांनी आपले नवस फेडले.मूळपीठ डोंगराबरोबरच श्रीभवानी चित्रसंग्रहालय पहाण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. मूळपीठ डोंगरा बरोबरच ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवी व कराडदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ऐतिहासिक पद्माळे तळयातही अनेक भाविकांनी मनोभावे स्नान केले .मोकळाई व तुकाईदेवीचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवानिमित्त राजवाडा, गावातील यमाई मंदिर, मूळपीठ डोंगर परिसरातील मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागील तीन दिवसात मोठ्या प्रमाणात भाविकांनी औंधला भेट दिली व देवीचे दर्शन घेतले.नवरात्रोत्सवानिमित्त व्रतवैकेल्य,पूजापाठ तसेच धार्मिक  कार्यक्रमांमुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या असल्याने मूळपीठ डोंगराच्या पायथ्याशी, श्रीभवानी चित्रसंग्रहालय परिसरात मोठ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.
फोटो कँप्शन.. औंध येथील मूळपीठ डोंगरावर भाविकांच्या लागलेल्या रांगा

Post a Comment

0 Comments