औंध येथील मूळपीठ डोंगरावर अष्टमी उत्सवानिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत निघालेली पालखी मिरवणूक.
औंध:-महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीयमाईदेवीचा अष्टमी उत्सव "आई उदे ग अंबे उदेच्या"जयघोषात गुलाल उधळून ,फळांचा प्रसाद वाटून हजारो भाविकांच्या उपस्थितीत मूळपीठ डोंगरावर मोठ्या उत्साहपूर्ण, अपूर्व मंगलमय वातावरणात पार पडला.
महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठापैकी एक औंधची श्रीयमाईदेवी ओळखली जाते.प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात येथील नवरात्रोत्सव साजरा केला जातो.यंदाही मूळपीठ निवासिनी, ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवीच्या व राजवाडयातील कराडदेवीच्या उत्सवानिमित्त मागील सात दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यानिमित्त नियमित मंत्रपठन,मंत्रपुष्पांजली, महाआरती, कीर्तन व अन्य कार्यक्रम सकाळी व रात्री आयोजित केले जात आहेत. मंगळवारी देवीच्या पाटयापूजन ,देवीची ओटी भरणाचा कार्यक्रम पार पडला. गुरुवारी देवीच्या अष्टमी उत्सवानिमित्त हरिजागरानिमित यात्रा भरविण्यात आली.यावेळी श्रीयमाईदेवी देवस्थानच्या चीफ ट्रस्टी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी देवीचे दर्शन घेऊन श्रीयमाईदेवीच्या उत्सवमूर्तीचे पूजन केले.त्यानंतर मानकर्यांच्या सत्कारासह,वाद्यव्रूंदाच्या सलामीनंतर विविध देवतांचे ,पूजन व भेट सोहळा झाला. मंत्रपठन गणेशशास्त्री इंगळे,शशिकांत इंगळे,अनिरुद्ध इंगळे व मान्यवरांनी केले. यावेळी मानकर्यांनी मानाच्या सासनकाठया नाचविल्या. देवीचे मानकरी गोंधळी,तेलभूते यांनी श्रीयमाईदेवी चरणी आपली सेवा अर्पण केली.
यावेळी एकूण नऊ देवतांचे त्यामध्ये बनबुवा,दत्त व अन्य देवतांचे पूजन करण्यात आले.
यावेळी राजघराण्यातील रोशन खंबाटा, बख्तावर अंटी,सभापती संदिप मांडवे, माजी सभापती सोनालीताई खैरमोडे,
हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने,उपसरपंच सचिन शिंदे,चेअरमन रमेशबापू जगदाळे, आब्बास आतार ,शामपुरी महाराज, शंकरराव खैरमोडे, शाकिर आतार, नंदुशेठ शिंदे,शहाजी यादव,सपोनि सुनील जाधव ,ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान शुक्रवारी कुमार कुमारी पूजन व अन्य धार्मिक कार्यक्रम औंध येथे आयोजित केले जाणार आहे.

0 Comments