Hot Posts

6/recent/ticker-posts

जेजुरीत मर्दांनी दसरा उत्सवाची जय्यत तयारी


जेजुरी ,दि.२९(वार्ताहर) अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाची जेजुरी नगरी सजली असून गडकोट ,मंदिर आवार,रमणा मार्ग,तसेच शहरातील मुख्य चौकांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे,मार्तंड देवसंस्थान, व खांदेकरी -मानकरी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने उत्सवाची जय्यत तयारी करण्यात असली आहे ,शनिवारी (दि.३०)सायंकाळी ६ वाजण्याचे सुमारास भेटाभेट व नगरप्रदक्षिणेसाठी पालखी सोहळा प्रस्थान ठेवल्यानंतर सुमारे १६ ते १८तास हा सोहळा रंगणार आहे ,रविवारी (दि.१)सकाळी ऐतिहासिक खंडा(तलवार)कसरत स्पर्धेने व रोजमुरा वाटप होऊन सोहळ्याची सांगता होणार आहे ,खंडोबाच्या जत्रा यात्रा उत्सवातील दसरा हा महत्वपूर्ण उत्सव मानला जातो ,हा ग्रामस्थांच्या मानापानाचा सण असल्याने उद्योग व्यवसायानिमित्त शहराबाहेर असलेला जेजुरीकर हमखास गावाची वाट धरतो ,आपल्या परिवारासह जेजुरीत येत उत्सवात सहभागी होत ,रूढी परंपरेनुसार कुलधर्म कुलाचार करीत आपली सेवा श्रींचे चरणी रुजू करतो ,सालाबादप्रमाणे यंदाही उद्योग व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेला ग्रामस्थ जेजुरीत दाखल झाला आहे ,
जेजुरीत गोंडा फुललाच नाही
दसरा म्हटले की ,येथल्या परिसरात फुललेला गोंडा(गर्द केशरी रंगाचे झेंडूचे फुल)प्रथम नजरेसमोर येतो,कऱ्हेच्या काठावरील झेंडूचे फुल अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ,आणि दसरा सणाला या फुलांना मोठी मागणी असते ,गेली क्रित्येक वर्ष येथील शेतकरी हमखास नगदीचे पीक म्हणून गोंडा(झेंडू) पीक घेतात ,या पिकावरच दसरा आणि दिवाळीसण साजरा होतो ,त्याचबरोबर पुणे ,मुंबई, गुजरात येथील फुल व्यावसायिक व व्यापारी मोठ्या संख्येने जेजुरीत येऊन गोंडा खरेदी करतात ,दसऱ्याच्या अगोदर दोन -तीन दिवस पंचक्रोशीतील शेतकरी व व्यापाऱ्यांमुळे मोठी उलाढाल येथे होते, मात्र यंदा पाऊस विलंबाने झाल्याने शेतकऱ्यांनी गोंडा पीक अत्यन्त कमी प्रमाणात घेतले त्यामुळे पुणे -मुंबई कडील व्यापारी -व्यवसायिक जेजुरीत दिसलेच नाहीत ,तरीही यंदा गोंडयाला किरकोळ विक्रीतून ४० ते ५०रुपये किलोचा भाव मिळाला,

Post a Comment

0 Comments