Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रध्दा पंडितला ‘ कृषीथॉन ’ पुरस्कार


वडूज : येथील श्रध्दा हर्षवर्धन पंडित या विद्यार्थीनीस ह्युमन सर्व्हिस फौंडेशन व मिडीया एक्झीबिटर्स प्रा. लि.  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘ कृषीथॉन ’ आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातील ‘ कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी ’ पुरस्कार जाहिर झाला आहे.
ती येथील सामाजिक कार्यकर्ते व हॉटेल चैतन्यचे मालक हर्षवर्धन पंडित यांची मुलगी असून ती लोणी काळभोर जि. पुणे येथील एम.आय.टी. अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयात ‘ फुड टेक्नॉलॉजी ’ पदवी परिक्षेच्या अंतीम वर्षात शिकत आहे. 26 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता ठक्कर्स डोम, त्र्यंबकेश्‍वर रोड, नाशिक येथे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. तीला प्राचार्य वसंतराव पवार, प्रा. गौरी आठवले, प्रा. दिप्ती चौधरी, प्रा. अनुपमा देवकाते, प्रा. प्रेरणा शेरे, प्रा. कविता माने, प्रा. सुजाता घोडके, प्रा. पठाण आदिंचे मार्गदर्शन लाभले. या पुरस्काराबद्दल तीचे भाजपा तालुकाध्यक्ष विकल्पशेठ शहा, नगराध्यक्षा शोभा माळी, बांधकाम समितीचे सभापती वचनशेठ शहा, सुहास शहा, वैभव शहा, वैशाली फळे (अकलूज) आदिंनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments