Hot Posts

6/recent/ticker-posts

मुद्रांक विक्रेत्यांच्या बंदला माण तालुक्यात प्रतिसाद


वरकुटे-म्हसवड / दिपक काटकर
     महाराष्ट्र राज्य मुद्रांक विक्रेत्या संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला माण तालुका मुद्रांक विक्रेत्या संघटनेने पाठिंबा दिला असल्याने तालुक्यातील मुद्रांकावर आधारीत सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.
          याबाबत माहिती देताना माण तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांच्या संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब औताडे म्हणाले की शासनाने संघटनेशी चर्चा करुनही विचार केलेला नाही.यासाठी महाराष्ट्र राज्य मुद्रांक विक्रेत्या संघटनेला पाठिंबा देण्यासाठी माण तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्या संघटनेने बंद पुकारला आहे. आपल्या संघटनेच्या मागण्या विषयी बोलताना ते म्हणाले की राज्यात पुर्वीप्रमाणेच छापिल मुद्रांक विक्री सुरु ठेऊन त्यावर १० टक्के मनौती मिळावी. ई चलन व ई एस बी आर टी प्रणाली मुद्रांक विक्रेते दस्त लेखनिक यांच्या मार्फत राबवण्यात यावी.मयत मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना विक्रेता परवाना वारसाहक्काने मिळावा.
      या व इतर अशा अनेक मागण्यांसाठी आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.  हा बंद यशस्वी करण्यासाठी सातारा जिल्हा कार्यकारणी सदस्य मोहन गोसावी व अर्जुन देवकर ,तालुका कार्यकारणी सदस्य धनाजी पोळ , धनाजी शिंदे,आप्पा कवळे , राजाराम लाखे , दत्तात्रय त्रिगुणे , अमोल गुजर परिश्रम घेत आहेत.
        आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत बंद सुरुच ठेवणार असल्याचे अध्यक्ष  तात्यासाहेब औताडे यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments